…’ती’ तर भाजपाची जुनी सवय; अमरावती हिंसाचारावरून पटोलेंचा टोला

...'ती' तर भाजपाची जुनी सवय; अमरावती हिंसाचारावरून पटोलेंचा टोला
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

अमरावती हिंसाचारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जेव्हा - जेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणुका असतात, तेव्हा -तेव्हा भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम केले जाते, असे त्यांनी म्हटले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Nov 14, 2021 | 1:48 PM

नागपूर : अमरावती हिंसाचारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जेव्हा – जेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणुका असतात, तेव्हा-तेव्हा भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम केले जाते. त्याचा प्रचार करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा प्रकरण देखील त्याचाच एक भाग आहे. ही भाजपाची जुनी सवय आहे. मात्र आता ही चाल जनतेच्या लक्षात आल्याने हिंदू , मुस्लिम भाजपाच्या प्रचाराला बळी पडणार नसल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

महागाईला केंद्राची धोरणे जबाबदार 

यावेळी बोलताना ते म्हणाले की देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईला केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून, याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. देशामध्ये भुकमारी वाढत आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, सविधान धोक्यात आले आहे. याचा जाब काँग्रेस सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय राहाणार नाही. दरम्यान  त्यांनी जनतेला शांतता ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. त्रिपुरामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही, या सर्व अफवा आहेत. कोणीही अफवांना बळी पडू नका. मालमत्तेचे नुकसान करू नका असे पटोले यांनी म्हटले आहे.

‘सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न ‘

भाजपाकडून सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या नेत्यांनी पहाटेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र ते मुख्यमंत्रीपद त्यांना एक दिवसही टिकवता आले नाही, याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे ते सातत्याने सरकार अस्थिर कसे होईल याचा विचार करत असतात, असे म्हणत त्यांनी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होते ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र अधिवेशन कुठे घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार हा सरकार व विरोधकांचा असतो, तेच ठरवतील अधिवेशन कुठे घ्यायचे आहे. तसेच आम्हाला विधानपरिषदेसाठी जाग मिळेल आणि आम्ही तिथून निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या 

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें