एका समाजातील मुलाने दुसऱ्या समाजातील मुलीला पळवले; त्यानंतर गावात असा झाला वाद

गोंधळ घालणाऱ्या सुमारे १७ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या गावात तणावपूर्ण शांतता आहे. दंगा काबू पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले.

एका समाजातील मुलाने दुसऱ्या समाजातील मुलीला पळवले; त्यानंतर गावात असा झाला वाद
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 11:35 AM

बुलढाणा : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात वडनेर भोलजी या गावी एका समाजातील मुलीला दुसऱ्या समाजातील मुलाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडलीय. यामुळे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्या आणि गाड्यांची जाळपोळ ही करण्यात आलीय. गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. या घटनेमुळे वडनेर भोलजी गावात सध्या तणाव सदृश्य परिस्थितीत आहे. गावाला छावणीचे स्वरूप आलेय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तब्बल 17 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत. पोलिसांकडून दंगल घडवणार्‍यांची धरपकड मोहीम सुरू करण्यात आली आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक वडनेर भोलजी या गावात दाखल झाली आहे. त्यामुळे वडनेर भोलजी या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मुलाने मुलीला पळवले

ही गोष्ट आहे वडनेर भोळजी या गावातील. एक समाजातील मुलाला दुसऱ्या समाजातील मुलगी पसंत होती. दोघेही ऐकमेकांवर प्रेम करत होते. पण, समाज विरोध करेल, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे मुलाने मुलीला पळवले. पण, त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. दोन्ही समाजातील लोकं एकमेकांवर तुटून पडले. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर गावात गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.

लोकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ

समाजातील लोकं पोलीस ठाण्यात गेले. तिथंच त्यांनी गोंधळ घातला. या घटनेमुळं पोलीस सतर्क झालेत. या दोन्ही समाजाला शांत कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. गोंधळ घालून वाद निर्माण केल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल केले.

गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

गोंधळ घालणाऱ्या सुमारे १७ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या गावात तणावपूर्ण शांतता आहे. दंगा काबू पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आता या वडनेर भोलजी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.