AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे धुताना कपड्यांचा रंग फिकट पडतो, तुम्ही सुद्धा ‘या’ 5 चुका करताय का? जाणून घ्या

बहुतेकवेळा चुकीच्या पद्धतीने कपडे धुतल्याने कपड्यांचा रंग फिकट होतो शिवाय कपड्यांना सुरकूत्या पडतात. त्यामुळे कपडे धुताना काही सोप्या खबरदारी लक्षात ठेवल्याने सुरकुत्या टाळता येतात आणि कपड्यांचा रंग देखील टिकून राहतो. चला कोणत्या आहे या टिप्स जाणून घेऊयात.

कपडे धुताना कपड्यांचा रंग फिकट पडतो, तुम्ही सुद्धा 'या' 5 चुका करताय का? जाणून घ्या
washing cloths
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 1:11 PM
Share

अनेकदा काही कपडे धुतल्यानंतर त्यांना सुरकुत्या पडतात, ज्यामुळे ते सुकल्यावर प्रत्येक कपड्याला इस्त्री करावी लागते. तर काही वेळा कपडे धुतल्यानंतर कपड्यांचा रंगही फिकट होतो तेव्हा आपण कापड चांगल नाहीये म्हणत कपड्यांना दोष देत असतो. पण कधीकधी आपली कपडे धुण्याची पद्धत सुद्धा तितकीच जबाबदार असते. ज्यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडणे त्यांचा रंग कमी होऊन कपडे फिकट दिसणे. मात्र कपडे धुताना तुम्ही जर या चुका टाळल्यास आणि छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पहिजेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कपडे धुताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

 क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकणे

तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी जास्त अतिरिक्त कपडे धुण्यास टाकता का? जेव्हा वॉशिंग मशीन किंवा ड्रायर ओव्हरलोड करता तेव्हा कपड्यांना त्यात फिरण्यासाठी पुरेशी जागा नसते. यामुळे कपडे गुंतले जातात आणि धुण्याची आणि वाळवण्याची प्रक्रिया केवळ कापडाचे तंतू ताणत नाही तर सुरकुत्या देखील निर्माण करतात. मशीनवरील सूचनांनुसार नेहमी मशीनमध्ये त्याप्रमाणातच कपडे धुण्यास टाका.

कपडे एकत्र धुण्यासाठी टाकणे

कपडे धुण्याची एक सामान्य चूक म्हणजे घरातील प्रत्येकाचे कपडे एकत्र धुण्यासाठी टाकणे. तुम्ही फक्त कपड्याचा रंग जातोय म्हणून वेगळे धुता पण कापडानेही कपडे वेगळे करून धुतले पाहिजेत. जेव्हा तुम्ही मऊ कापड आणि जीन्स सारख्या जड असलेले कापड एकत्र मशीन मध्ये धुवायला टाकता तेव्हा ते तीव्र घर्षण निर्माण करते आणि मऊ कापड लवकर झिजते. शिवाय, प्रत्येक कापडासाठी हलका किंवा जड डिटर्जंट आवश्यक असतो, म्हणून कपड्यांच्या पद्धतीनुसार कपडे धुवावेत.

धुतल्यानंतर कपडे लगेच वाळत न टाकणे

आपल्यापैकी अनेकजण कपडे धुवून झाल्यानंतर पिळून तसेच ठेवतात व काहीवेळाने ते कपडे सुकण्यास टाकतात. पण यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडतात. अशावेळेस तुम्ही जेव्हा कपडे हाताने पिळता तेव्हा ते लगेच हलके झटकून हॅन्गरवर लटकवावेत. आणि जर तुम्ही ते ड्रायरमध्ये वाळवले असतील तर ते लगेच बाहेर काढा आणि वाळत टाका.

बराच वेळ भिजत ठेवणे

कपड्यांमधील घाण पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण कपडे डिटर्जंट पाण्यात भिजत ठेवतात. पण कपडे जास्त वेळ भिजवून ठेवू नका याची काळजी घ्या. अनेकदा रात्रभर कपडे भिजवून ठेवतात यामुळे केवळ कपड्यांची घाण निघून जात नाही तर कपड्यांचा रंगही फिकट होतो. कपडे साधारणपणे 1 ते 2 तास भिजवून ठेवणे पुरेसे असते.

जास्त गरम पाणी वापरणे

कपड्यांच्या साफसफाईसाठी अनेकदा गरम पाण्याचा वापर केला जातो, परंतु यासाठी देखील तापमानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. खूप गरम पाण्यामुळे तुमचे कपडे आकुंचन पावू शकतात, फॅब्रिक कमकुवत होऊ शकते आणि लवकर फिकट होऊ शकते, ज्यामुळे महागड्या वस्तू देखील काही दिवसांनी जुने असल्यासारखे दिसू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?