Buldana Fire | बुलडाण्यात सामाजिक वनीकरणच्या जंगलाला आग; शेकडो झाडे जळून खाक

या आगीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने लावलेले शेकडो वृक्ष जळून भस्मसात झालेत. यामध्ये 10 हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड झालेली आहे. ही लागवड 2019 च्या पावसाळ्यात झालेली होती. या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने 11 हजार 110 रोपांची लागवड केलीय.

Buldana Fire | बुलडाण्यात सामाजिक वनीकरणच्या जंगलाला आग; शेकडो झाडे जळून खाक
बुलडाण्यात सामाजिक वनीकरणच्या जंगलाला आग
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 12:03 PM

बुलडाणा : महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने किनगाव जटटूच्या देवानगर (Devanagar) येथील जमिनीवर झाडे लावली होती. या जंगलाला मोठ्या प्रमाणात अचानक काल दुपारी आग लागली होती. यामध्ये शेकडो झाडे जळून खाक झालीत. यावेळी याच रस्त्यावरून भुमराळा (Bhumrala) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार देवानंद सानप (Devanand Sanap) प्रवास करत होते. आग लागल्याचे दिसताच देवानंद सानप यांनी तात्काळ सहकार्यासह आगीकडे धाव घेतली. पळसाच्या झाडांच्या फांद्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात आग विझवण्यात सानप आणि सहकाऱ्यांना यशसुद्धा आले. मात्र हवा असल्याने काही ठिकाणी आगीने रौद्र रूप धारण केलेले होते. अशा ठिकाणी मात्र आग विझवण्यात त्यांना अपयश आलेत.

11 हजार 110 रोपांची लागवड

या आगीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने लावलेले शेकडो वृक्ष जळून भस्मसात झालेत. यामध्ये 10 हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड झालेली आहे. ही लागवड 2019 च्या पावसाळ्यात झालेली होती. या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने 11 हजार 110 रोपांची लागवड केलीय. यामध्ये पापडा, करंज, आवळा, साग, बांबू, कांचन, शिसम, निम, सिताफळासह इतर प्रजातीचा समावेश आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद सानप यांनी दिली.

…तर नुकसान टाळता आले असते

आग लागल्याचे लक्षात येताच देवानंद सानप यांनी या आगीची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला दिली होती. मात्र, दोन-तीन तास उलटून गेले. तरीही कोणीच घटनास्थळी आले नव्हते. तात्काळ वनीकरण विभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी ही आग विझवण्यासाठी घटनास्थळावर यायला हवे होते. ते वेळेवर आले असते तर, लावलेली रोपे काही प्रमाणात का होईना वाचली असती. होणारे नुकसान टाळता आले असते.