मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले.

मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपची मारहाण, अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला
मनसे विरुद्ध भाजप
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 6:05 PM

बुलडाणा : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (Bjp) संघर्ष पटेला असताना बुलडाण्यात भाजप विरुद्ध मनसे (Mns) पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले. मात्र तरीही त्यांना पाच दिवसानंतर अटक झाली नाही. त्यामुळे धनवट समाज एकजुट झाला असून आरोपींच्या अटकेसाठी आज पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलेय. राज्यात आगामी नगरपंचायती आणि जल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे सध्या जोर लवात आहेत. मात्र खळखट्याक अशी ओळख असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यालाच मराहण झाल्याने सर्वांचे लक्ष या घटनेने वेधले आहे.

मनसेचा अटकेसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली चे येथील मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसात आरोपींना अटक करा , अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करू असा इशारा दिला होता.मात्र पोलिसांनी आरोपिना अद्यापही अटक केली नाहीये. तर आज पुन्हा जखमी अजय खरपास यांचे नातेवाईक सह धनवट समाज यांनी सुद्धा एकत्रित येत चिखली पोलीस स्टेशनवर मोरचा काढला आणि मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार सह पोलीसाना निवेदन देत आरोपिना तात्काळ अटक करा, अशी मागणी केलीय. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केलीय.

भाजप पदाधिकाऱ्यांना प्रकरण भोवणार?

काही दिवसातच राज्यात महानगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सध्या दौरे सुरू आहेत. भाजपही या निवडणुकीत जोमाने उतरले आहे. स्थानिक लेव्हलच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकांकडे लक्ष असते. या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसे आणि भाजपमधील संघर्ष वाढला आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या पोस्टवर आक्रमक होत भाजप कार्यकर्त्यांनी केलेली ही मारहाण आता भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात या संघर्षाची धार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा मोदींना देशातील निवडणूका महत्त्वाच्या, जयंत पाटलांनी करून दिली त्या ट्विटची आठवण

मलिकांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली, केंद्र सरकारच्या कारवाया राजकीय सूडभावनेतून- जयंत पाटील