गाय शोधण्यासाठी गेलेला १३ वर्षांचा मुलगा परतलाच नाही, ही दुःखद घटना आली समोर

त्याच्या शोधासाठी नातेवाईक घराबाहेर पडले. गावभर जयबाबत विचारत होते. संध्याकाळी जय फिरताना दिसल्याचे लोकं सांगत होते.

गाय शोधण्यासाठी गेलेला १३ वर्षांचा मुलगा परतलाच नाही, ही दुःखद घटना आली समोर
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 3:52 PM

बुलढाणा : जय हा तेरा वर्षांचा चुणचुणीत मुलगा. तेरा वर्षांचा झाल्याने घरच्यांना कामात मदत करायचा. जयच्या घरी गायी आहेत. संध्याकाळ झाली तरी गाय घरी परतली नाही. म्हणून जय गाय शोधण्यासाठी गेला. पण, गायीचा पत्ता लागला नाही. त्यामुळे तो गावाच्या आजूबाजूला गेला. गावाजवळून एक नदी वाहते. गायीच्या शोधात जय नदीत शिरला. तो परतलाच नाही. इकडे घरी नातेवाईक चिंतेत पडले. जय केव्हा परत येईल, याची वाट पाहत होते. सात-आठ वाजतापर्यंत जय घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी नातेवाईक घराबाहेर पडले. गावभर जयबाबत विचारत होते. संध्याकाळी जय फिरताना दिसल्याचे लोकं सांगत होते. आज सकाळी शेवटी जयचा मृतदेह सापडला.

मृतदेह झुडपात अडकला

काल जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला. खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील नदीला आलेल्या पुरात जय विठ्ठल तायडे हा 13 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. आज सकाळी त्याचा मृतदेह भालेगाव येथील नदीच्या झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडला.

पुरात वाहून गेला

मृतक जय हा आपली गाय शोधण्यासाठी गेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नदी पार करताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यावेळी तो पुरात वाहून गेला. ग्रामस्थांनी रात्रीला शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.

तायडे कुटुंबावर शोककळा

आज सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह तीन किमी असलेल्या भालेगाव येथील नदीकाठच्या झुडपात आढळला. यामुळे तायडे कुटुंबावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतक जय तायडे याचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

चप्पल पडल्याने जियान नाल्यात वाहून गेला

अकोला शहरात नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. काल झालेल्या पावसामुळे खैर महम्मद प्लॉटमधील नाल्याला आलेल्या पाण्यात 10 वर्षीय मुलगा वाहून गेला. रात्रीपासून शोध सुरु होता. आज सकाळी अकोट रोडवरील पाचमोरीजवळ मृतदेह सापडला. मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव जियान अहमद इक्बाल आहे. जियान मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात खेळत असताना चप्पल नाल्यामध्ये पडली. चप्पल काढत असताना तोल गेल्याने जियान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला होता.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.