कोण आहेत धीरज लिंगाडे ज्यांनी रणजित पाटील यांचा पराभव केला; काय आहेत विजयाची गणितं?

| Updated on: Feb 03, 2023 | 3:39 PM

अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे 3382 मतांनी विजयी झाले. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला. त्यामुळं रणजित पाटील यांची हॅट्ट्रीक हुकली.

कोण आहेत धीरज लिंगाडे ज्यांनी रणजित पाटील यांचा पराभव केला; काय आहेत विजयाची गणितं?
धीरज लिंगाडे
Follow us on

बुलढाणा : अमरावती पदवीधर मतदार संघाचे (Amravati Graduate Constituency) उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) अखेर विजयी झाले. तब्बल 33 तासांनंतर लिंगाडे यांचा विजय झाला. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे रणजित पाटील हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. याच मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पण, यावेळी महाविकास आघाडीचे समर्थन असलेले धीरज लिंगाडे यांनी पाटील यांचा पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का देणारे धीरज लिंगाडे यांची माहिती जाणून घेऊया.

अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे 3382 मतांनी विजयी झाले. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला. त्यामुळं रणजित पाटील यांची हॅट्ट्रीक हुकली. 1 लाख 2 हजार 587 मतांपैकी धिरज लिंगाडे यांना 46,344 मते मिळाली. पराभूत झालेले भाजपचे रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.

आता लिंगाडे यांनी राजकारणात मोठी झेप घेतली आहे. वडिल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ते स्वतः शिवसेनेतून नगरसेवक होते. आता काँग्रेसकडून त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविली. त्यात त्यांनी रणजित पाटील यांचा पराभव केला.

धीरज रामभाऊ लिंगाडे यांचा जन्म ६ एप्रिल १९७२ चा. शिक्षण B. A., LLB पर्यंत झालेले. १९९८ ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा काँग्रेसकडून विजयी झाले होते. २०१० ला शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख होते. पुढे शिवसेनेमध्ये कार्यरत होते. २०२३ ला विधान परिषद निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धीरज यांच्या पत्नीचे नाव पद्मजा लिंगाडे आहे. त्यांना दोन मुलं आहेत. वेदांत व सोहम अशी त्यांची नावे.

वडील स्व. रामभाऊ बाबूराव लिंगाडे हे माजी गृहराज्यमंत्री होते. १९७८ ते १९८३ या कालावधीत विधान परिषद आमदार, अकोला -बुलढाणा -वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून ते आमदार झाले होते. स्व. रामभाऊंनी १९९९ ला शरद पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

धीरज यांना सामाजिक व मित्र जमवण्याची प्रचंड आवड. संगीत व बॅडमिंटनची आवड आहे. प्रथम आई-वडील व नंतर गजानन महाराज हे त्यांचे श्रद्धास्थान आहे. धीरज लिंगाडे यांच्याकडे स्व. रामभाऊ लिंगाडे सहकारी पतसंस्था, बुलढाणा ( १९९४ पासून) आहे. आता ७ शाखा झाल्या आहेत.

आधी यशवंत डी. एड. कॉलेज १९६९ पासून तर आता त्याच कॉलेजचे नाव स्व. रामभाऊजी लिंगाडे डीटीएड कॉलेज आहे. २०१० पासून बी. एड. कॉलेज, २००८ पासून पॉलिटेक्निक कॉलेज आणि २०१४ पासून बुलढाणा केंब्रिज स्कूल (सीबीएससी पॅटर्न त्यांनी सुरू केली. २०२२ पासून डी. फार्मसी कोर्सही सुरु केला.