Ashok Kharat : भोंदू खरात अंडीचोर, गावकऱ्यांनीच केली पोलखोल, कठोर शिक्षेची मागणी

भोंदू बाबा उर्फ कॅप्टन अशोक खरात सध्या महिलांवर अत्याचार, फसवणूक आणि कोट्यवधींच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण करणारा हा खरात पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील त्याच्या वावी गावातील गावकऱ्यांनी त्याच्या भूतकाळाचे अनेक धक्कादायक पैलू उघड केले आहेत, ज्यात १०वी नापास आणि अंडी चोरण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

Ashok Kharat : भोंदू खरात अंडीचोर, गावकऱ्यांनीच केली पोलखोल, कठोर शिक्षेची मागणी
गावकऱ्यांकडून अशोक खरातची पोलखोल
| Updated on: Mar 26, 2026 | 1:25 PM

महिलांवर अत्याचार, फसवणूक, कोट्यवधींची संपत्ती, अशा अनेक गोष्टींमुळे भोंदूबााब उर्फ कॅप्टन खरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. भविष्य सांगण्याचा बनाव करून, महिलांना जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा, त्या शोषणाचे रेकॉर्डिंगही करणारा अशोक खरात पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी होत आहे. अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींची त्याच्याकडे ऊठबस होती, मात्र आता याच खरातचं भविष्य अंधारात आहे. त्याच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान अनेक नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याचदरम्यान खरात हा नाशिकमधल्या सिन्नर येथील ज्या गावचा रहिवासी होत, तेथील गावकऱ्यांनी त्याच्याबद्दल बोलत अनेक कारनाम्यांची पोलखोल केली आहे. सिन्वर तालुक्यातील वावी गावात भोंदू अशोक खरातचं 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्याच शाळेच्या परिसरात गावकऱ्यांनी खरातचे अनेक किस्से सांगितले.

स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा, भविष्य सांगण्याचा दावा करणारा हा खरात 10 वीत नापास झाला, गणितातही त्याची दांडी उडाली होती. एवढंच नव्हे तर तो काही कॅप्टनही नव्हता असंही उघड झालंय.

भोंदू बाबा चोरायचा अंडी

भोंदू खरातमुळे आमच्या गावाचं नाव बदनाम होतंय असं म्हणत गावकऱ्यांनी त्याची पोलखोल केली. अशोक खरात हा कोंबड्या कशा चोरायचा, अंडी चोरून कसा विकायचा ते गावकऱ्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी झाली आहे, खरंतर आमच्या शाळेच नाव चांगल्या पद्धतीने घ्यायला हवं होतं, पण ते अशा पद्धतीने समोर येतंय हे वाईट आहे, अशी भावना एका गावकऱ्याने मांडली. शाळेत तो इथो होता, पण गावात त्याची ओळख कोंबडीचोर अशीच आहे. तोच त्याचा मुख्य धंदा होता, असं आमच्या वडिलांनी सांगितल्याचं आणखी एकाने सांगितलं.

एका कॅप्टन खरातमुळे आमच्या वावी गावांच नाव बदनाम झालं, पूर्ण खराब झालं. आम्ही जेव्हा इशान्येश्वरला जायचो, तेव्हा देवाच्या पाया पडायाल, तिथे आशीर्वाद घ्यायला जायचो. पण हा माणूस देवाच्या आडून असे काही धंदे करेल याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती, अशा शब्दांत एका गावकऱ्याने संताप व्यक्त केला. अशोक खरातचे एकेक प्रताप पाहून गावकरी संतापले आहेत. त्याने सगळं चोरीच्या मार्गाने कमावलं, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us