रुग्णांची सुरक्षा रामभरोसे, नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार…

नाशिकचे जिल्हा रुग्णालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असते. आताही रुग्णांच्या अंगावर सीलिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे.

रुग्णांची सुरक्षा रामभरोसे, नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 07, 2022 | 1:46 PM

नाशिक : राज्यातील आरोग्य यंत्रणेत कधी सुधारणा होतील ? असा संतप्त सवाल नाशिकमधील (Nashik) नागरिक उपस्थित करू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये रुग्णांच्या अंगावर जिल्हा रुग्णालयातील सीलिंग (Ceiling) कोसळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांची सुरक्षा ही रामभरोसे आहे असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. दैव बलवत्तर असल्याने यामध्ये रुग्णाचा जीव वाचला असून मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर शस्रक्रिया करून दाखल केलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नाशिकचे जिल्हा रुग्णालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असते. आताही रुग्णांच्या अंगावर सीलिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्रक्रिया करून रुग्णांना ज्या वॉर्डमध्ये ठेवले जाते तिथेच हा प्रकार घडला आहे.

या वॉर्डमध्ये दिवसभर सीलिंगला असलेले पीओपी शिटमधून पाणी झिरपत होते. त्यामुळे सीलिंग पूर्णतः ओली झालेली होती त्यामुळे पीओपी कोसळल्याची घटना घडली.

रुग्ण उभा असतांनाच त्याच्या अंगावर न पडता बाजूलाच पडले सुदैवाने रुग्ण थोडक्यात वाचला असून त्यास किरकोळ धक्का लागला होता.

तात्काळ ही बाब रुग्णांनी परिचरिकेला कळवली आणि त्यांनी लागलीच वरिष्ठांना ही बाब कळवत माहिती दिली त्यानंतर रुग्णाची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अशा बाबी काही नवीन नाही. नेहमीच जिल्हा रुग्णालयात अशा गंभीर घटना घडत असतात. त्यामुळे रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असते.

जिल्हा रुग्णालय प्रशासन या घटनेवर धडा घेऊन आगामी काळात योग्य रुग्णसेवा देणार का ? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहे.