मध्य रेल्वेच्या २४६ स्पेशल गणपती ट्रेन घोषीत,अनारक्षित ट्रेन वाढवण्याची मागणी

मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने कोकणात गणपतीच्या सणासाठी तब्बल २४६ गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. या ट्रेनचे आरक्षण १ , २ आणि ३ ऑगस्ट पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन सुरु होत आहे.

मध्य रेल्वेच्या २४६ स्पेशल गणपती ट्रेन घोषीत,अनारक्षित ट्रेन वाढवण्याची मागणी
Ganpati Special Trains
| Updated on: Jul 27, 2026 | 9:35 PM

मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि अनारक्षित अशा १८४ मिश्र स्पेशल ट्रेन असणार आहे. तर ६२ अनारक्षित विशेष ट्रेन असणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी कोकणात दोन ते चार दिवस जाऊन गणपती सण साजरा करत असतात. मध्य रेल्वेच्या नियमित ट्रेनचे आरक्षण नुकतेच सुरु होऊन फुल्ल देखील झाले आहे. आता या स्पेशल ट्रेनचे आरक्षण १ , २ आणि ३ ऑगस्ट पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन सुरु होत आहे.

यावेळी एकाच वेळी सर्व गाड्यांचे आरक्षण करावे लागणार नाही ही बाब त्यातल्या त्यात चांगली आहे. हे आरक्षण   1 ते 3 ऑगस्ट असे तीन दिवस विभागून दिले आहे. गाडी क्रमांक  01446 ही आढवड्यातून एकदाच आहे. आणि  ती देखील  15 सप्टेंबरला आहे. आणि गणपती यंदा 14 सप्टेंबरला येत आहेत. त्यामुळे दोन दिवस आधीची ट्रेन असतील तर चाकरमान्यांना फायदा झाला असता असे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.

अनारक्षित गाड्या सोडण्याची मागणी

गाडी क्रमांक  011003 ही गाडी दुपारी  3.30 ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडीला पोचणार ही वेळ गैरसोयीची आहे, कारण मध्यरात्री उशिरा कोकणातील विविध स्थानकावर या ट्रेन पोहचणार आहेत ही वेळ गैरसोयीची आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण हे विशेष भाडे आकारून केले जात असते. नेहमीपेक्षा साधारण 100 ते 200 रुपये ज्यादा आकारले जातात, त्यामुळे या ट्रेनची तिकिटे तरी सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहेत का?  वास्तविक अनारक्षित गाड्या सोडण्यावर भर द्यायला हवा होता असे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.

मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:

• सीएसएमटी येथून सुटणाऱ्या गाड्या – ९८ फेऱ्या

• लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्या – ७६ फेऱ्या

• पुणे येथून सुटणाऱ्या गाड्या – १० फेऱ्या

• अनारक्षित विशेष गाड्या – ६२ फेऱ्या

गणपती विशेष ट्रेनचा तपशील:

१) सीएसएमटी, मुंबई- सावंतवाडी रोड – सीएसएमटी, मुंबई दैनिक विशेष गाडी (३२ फेऱ्या )

  • ट्रेन क्रमांक 01103 दि. ११ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दररोज सीएसएमटी येथून दु. ३.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या)
  • ट्रेन क्रमांक 01104 दि. १२ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज सावंतवाडी रोड येथून सकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या)

थांबा: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना  : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

२) सीएसएमटी, मुंबई – सावंतवाडी रोड – सीएसएमटी, मुंबई – दैनिक विशेष गाडी ( ३४ फेऱ्या )

  • विशेष ट्रेन क्रमांक 01151 दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सीएसएमटी, मुंबई येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )
  • विशेष ट्रेन क्रमांक 01152 दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज सावंतवाडी रोड येथून दु. ३.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दु.०४.३५ वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या)

थांबा : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन

३) सीएसएमटी, मुंबई – रत्नागिरी – सीएसएमटी, मुंबई दैनिक विशेष गाडी (३२ फेऱ्या)

*  विशेष ट्रेन क्रमांक 01153 दि. ११ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दररोज सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या )

  • परतीची ट्रेन क्रमांक 01154 दि. १२ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज रत्नागिरी येथून पहाटे ४.०० वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या)

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन

४) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३४ फेऱ्या )

  • गाडी क्रमांक 01171 विशेष गाडी दिनांक ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )
  •  परतीची क्रमांक 01172 विशेष गाडी दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून रात्री २२.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

५) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (८ फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01131 विशेष गाडी दि.१७ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. ( ४ फेऱ्या )
  • परतीची ट्रेन क्रमांक 01132 विशेष गाडी दि. १७ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दर गुरुवारी आणि रविवारी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन

६) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ फेऱ्या )

  • ट्रेन क्रमांक 01129 विशेष ट्रेन दि. १५ आणि दि. २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )
  • परतीची ट्रेन क्रमांक 01130 विशेष गाडी दि. १५ आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

७) लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून ५ दिवस) विशेष गाडी (२२ फेऱ्या )

*  ट्रेन क्रमांक 01167 विशेष ट्रेन दि. १२ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या)

*  परतीची ट्रेन क्रमांक 01168 विशेष ट्रेन दि. १३ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून दु. ३.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या)

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

८) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एसी विशेष गाडी (४ फेऱ्या)

* ट्रेन क्रमांक 01165 वातानुकूलित विशेष गाडी दि. १५ आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

* परतीची ट्रेन क्रमांक 01166 एसी विशेष गाडी दि. १५ आणि दि. २२ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवि आणि करमळी.

डब्यांची रचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय,आणि २ जनरेटर व्हॅन्स.

९) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ सेवा)
गाडी क्रमांक 01185 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 01186 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबा : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे (केवळ गाडी क्रमांक 01185 साठी), थिवि आणि करमळी.

डब्यांची रचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

१०) पुणे – रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01445 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

गाडी क्रमांक 01446 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

गाडीची रचना: ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

११) पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२, १९ आणि दि. २६ सप्टेंबर रोजी पुणे येथून  रात्री १२:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )
  • परतीची गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

१२) दिवा – खेड – दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेष गाड्या (३२ फेऱ्या )

(दिनांक २२.०९.२०२६  वगळून)

गाडी क्रमांक 01155 मेमू विशेष गाडी दिनांक ११  ते दिनांक २७ सप्टेंबर या कालावधीत  ( दि.२२.०९.२०२६  वगळून)

दिवा येथून सकाळी ०७.१५ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या )

गाडी क्रमांक 01156 मेमू विशेष गाडी दिनांक ११ ते दिनांक २७ सप्टेंबर   या कालावधीत ( दि. २२.०९.२०२६  वगळून) खेड येथून दु. ४. ०० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी रात्री  १०.५० वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या )

थांबा : निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

डब्यांची रचना: १२ डब्यांची मेमू रॅक.

१३) दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३० फेऱ्या  )

( दिनांक २३.०९.२०२६ /दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून )

गाडी क्रमांक 01133 मेमू विशेष गाडी दिनांक ११  ते दिनांक २७ सप्टेंबर  या कालावधीत दररोज ( दि. २३ सप्टेंबर २०२६  वगळून) दिवा येथून दु. १.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री   ९.३० वाजता पोहोचेल. ( १५फेऱ्या )

गाडी क्रमांक 01134 मेमू विशेष गाडी दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २८.०९.२०२६ या कालावधीत दररोज ( दिनांक २४.०९.२०२६ वगळून ) चिपळूण येथून सकाळी  ०७.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी दुपारी १.०० वाजता पोहोचेल. (१५ फेऱ्या )

थांबा : निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी.

डब्यांची रचना : 12 कार मेमू रेक

“आरक्षण”. गणपती विशेष आरक्षित गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खालीलप्रमाणे सुरू होईल: –

दिनांक ०१ ऑगस्ट  २०२६ रोजी गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447

दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी गाडी क्रमांक 01165 आणि 01185

दिनांक ०३ ऑगस्ट  २०२८ रोजी गाडी क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us