AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणिकराव कोकाटे काय बघत होते…, रमीच्या व्हिडीओवर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

माणिकराव कोकाटे काय बघत होते..., रमीच्या व्हिडीओवर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2025 | 6:03 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे कायम चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहेत. विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावरून विरोधकांनी त्यांची कोंडी केली आहे, या व्हिडीओवर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

मी तर काही अजून बघितलं नाही काय आहे ते? माणिकराव कोकाटे काय बघत होते?  याबाबत मला काही माहिती नाही. मी सकाळपासून मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे मला काहीही माहीत नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आपसात भिडले, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं, यावर देखील भुजबळ यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.  मला 41 वर्षे होऊन गेले,  योग्य आहे असे कसे म्हणता येईल? 1985 मध्ये मी विधान भवनामध्ये आलो. विरोधी पक्षनेता झालो. 1991 ला महसूल मंत्री झालो. हाउसिंग मिनिस्टर झालो. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झालो.

त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचे बोलणारे लोक केशवराव धोंडगे, दिबा पाटील, दत्ता पाटील वेगवेगळे लोकं होते,  इकडून सुद्धा मोहिते, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, तर कधी छगन भुजबळ असाचे. एकमेकांच्या विरोधात जे काही मुद्दे असतील त्यावर भांडणं व्हायचे पण कोणाचं मण दुखायचं नाही, अशा प्रकारची सगळी चर्चा असायची.  मी तर त्या दिवशी डोक्याला हात लावला, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपाशी चर्चा करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. प्रश्न असा आहे की आज भाजप प्रणित सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एनसीपी गट सध्या आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला चर्चा होणे आवश्यक असतं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ