AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे यांना मदत कोणी केली? छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. परंतु त्यामुळे मुंबईत अराजकता निर्माण होऊ शकते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट देखील केला.

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे यांना मदत कोणी केली? छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
chhgan bhujbal NewsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 7:15 PM
Share

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर निघाले आहेत. जरांगे पाटील हे सध्या पोटोद्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांचा मुंबईचा दौरा होणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर आल्यास अराजकता निर्माण होऊ शकते, अशी शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्ती केली आहे. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना सरकारमधील काही लोकांनी मदत केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही9 चॅनलमधील बाप्पाचे दर्शन घेतलं. त्यानंतर राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करताना गौप्यस्फोट देखील केले. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील मुख्य विषय गणपतीचा विषय आहे. मुंबईत आज लाखो येत आहेत, गणेश दर्शनासाठी येत आहेत. जरांगेंचं नेहमीचं उपोषण आहे. त्यांची तब्येत बिघडली आहे. मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जावं. मुंबईत आज लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. आंदोलन त्यावेळेस येथे आंदोलन करणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एक प्रकारची अराजकता निर्माण होईल. त्यांनी घरी जाऊन थोडं आराम करावं. मनोज जरांगे पाटील कधीच कोणाचे ऐकत नाहीत’.

‘आमच्यातील मंत्री आणि आमदार त्यांच्याजवळ जातात. ते झोपलेले असतात. समोर कॅमेरे असतात. आमचे मंत्री आणि आमदार सगळे तिकडे जात असतात. विनवण्या केल्या. त्यामुळे त्यांना मोठा नेता किंवा फारचं मोठा नेता असल्याचा भास निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी त्यावेळी त्या मागण्या योग्या वाटल्या. त्यावेळी सरकारमधील लोकांनी मदत देखील केली. पण आता मारूतीच्या शेपट्यासारख्या जरांगेच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. शिंदे आणि फडणवीसांना शिव्या देणं यांचं सुरू झालेलं आहे. आधी मलाचं शिव्या देत होते, आता सर्वांना शिव्या देताहेत.

‘खरंतर हटवादीपणा मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजाला दिशाभूल करताहेत. स्टेजच्या येथून पाठीमागून तबांखू मळून खातात, तिथून सगळं खातो असं त्यांच्यासोबतचे लोक सांगतात. ईडब्लूएस आरक्षण सुरू केल्यानंतर अनेक राज्यातील लढा थांबला. 350 ते पावणे चारशे जातीचा वर्ग आहे. आरक्षण काही वाढणार नाही आहेत. एक वेगळं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे. मी काल मंत्रीमंडळात सांगितलेलं आहे. कुणीही काहीही असल्यास सांगावं, शिक्षणासाठी आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे. हीच पुढची पिढी आहे, ही पिढी सुशिक्षित झाली पाहिजे, मनोज जरांगेकडे सुशिक्षित आणि संस्कृतपणापणा नाही आहे, अशा शब्दात भुजबळ यांनी जरांगेंना टोला लगावला.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे