उठता येईना, बसता येईना, पोटात प्रचंड…मनोज जरांगेंची अवस्था नेमकी कशी आहे; स्वत:च सगळं सांगितलं!
मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईच्या दिशने निघालेले आहेत. त्याचदरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी मध्येच एका ठिकाणी सलाईन लावलं आहे. स्वतःच्या तब्येतीबद्दल जरांगेंनी भाष्य केलं आहे.

मी मुंबईच्या दिशेनेच आहे. पण मला आज सलाई लावल्याने उठता नाही आलं. मला आमच्या नारायणगडाच्या गुरु गादीनं महंत गुरुवर्यांनी सांगितलं की तुम्हाला सलाईन घ्यावंच लागणार आहे. त्यांनी मला गेल्या किती वर्षांत अशी कोणतीही विनंती केलेली नाही. त्यांनी तासभर सांगितलं की, आमच्यासाठी तुम्हाला सलाईन घ्यावं लागतंय. कोणत्या गोष्टीमध्ये गुरुंचं ऐकायचं, अन् कोणत्या गोष्टीत ऐकायचं नाही समजतं. मी यामध्ये त्यांच ऐकणार नव्हतो परंतू शेवटी गुरुंची विनवणी पागून मन तयार झालं. मला उठताही येईना, बसताही येईना. उठताना पायांमध्ये प्रचंड आग होते, असं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीवर बोलताना सांगितलं आहे.
बीडमधील पाटोद्यात जरांगे सलाईन घेत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, सरकारनं काहीतरी ड्राफ्ट पाठवला आहे. पण हे नेहमी फसवतात. त्यामुळं माझं डोकं चिडलं आहे. पण मी मेलो तरी हटणार नाही. उद्या दुपारी 1 वाजेनंतर मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. उद्या 100 टक्के मुंबईला जाणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनोज
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
