BJP : माजी भाजप खासदाराच्या लेकीची सासरी ये-जा करण्यासाठी अनोखी सोय, कोट्यवधी रुपये खर्च
BJP : माजी भाजप खासदाराच्या वाढदिवशीच त्यांच्या लेकीची सासरी ये-जा करण्यासाठी देखील मोठी सोय झाली. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे... सध्या सर्वत्र सर्वत्र भाजप खासदाराची चर्चा रंगली असून प्रकरण काय जाणून घ्या...

BJP : भारतात खासदार, आमदार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कारण फक्त राजकारणापर्यंत मर्यादित नसतं. तर, काही राजकीय नेते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. भाजप खासदाराच्या वाढदिवशीच त्यांच्या लेकीची सासरी ये-जा करण्यासाठी मोठी आणि अनोखी सोय करण्यात आली आहे. ज्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, नेमकं झालं तरी काय आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रमुख नेते आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. ही भेट त्यांना त्यांच्या मुलीने, शालिनी सिंह यांनी दिलेली आहे.
नोएडा येथे राहणाऱ्या शालिनी यांनी वडिलांना वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून हॅलीपॅड दिलं आहे. वडिलांना इतकं मोठं गिफ्ट दिल्याचं आनंद व्यक्त करत शालिनी हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. वाढदिवसाच्या आधी मिळालेली ही मोठी भेट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या मुलीकडून मिळालेली ही भेट पाहून ब्रिजभूषण सिंग भावूक झाले. ही भेट स्वीकारण्यासोबतच त्यांनी हेलिपॅडचे अधिकृत उद्घाटन देखील केलं.
View this post on Instagram
बृजभूषण यांच्याकडे आहेत तीन हेलिकॉप्टर
रिपोर्टनुसार यूपीचे बाहुबली नेते आणि गोंडा जिल्ह्यातील कैसरगंजचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह अत्यंत आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. याशिवाय बृजभूषण सिंह यांना घोडेस्वारीचीही आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागडे घोडे आहेत. सध्याच्या घडीला माजी खासदारांकडे तीन हेलिकॉप्टरसुद्धा आहेत. यांपैकी एक पांढऱ्या, एक काळ्या आणि एक भगव्या रंगाचं हेलिकॉप्टर आहे.
लेकीची सासरी ये-जा करण्यासाठी सोय
काळ्या रंगाचं हेलिकॉप्टर हे नोएडाच्या नव्या हेलिपॅडवर नेहमी उभं राहील. यामुळे त्यांची मुलगी शालिनी हिला सासरहून ये-जा देखील करणं सोपं होईल. तर भगव्या आणि पांढऱ्या रंगाचं हेलिकॉप्टर बृजभूषण यांच्या येण्या-जाण्यासाठी गोंडा येथेच राहतील. या हेलिकॉप्टरचा वापर माजी खासदार दूरवरच्या भागात ये-जा करण्यासाठी करतील.
भगव्या रंगाचे हेलिकॉप्टर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी त्यांनी एका भगव्या रंगाचे हेलिकॉप्टर खरेदी केले होते. ‘R-66’ मॉडेल असलेल्या या हेलिकॉप्टरची किंमत सुमारे सात ते आठ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. या हेलिकॉप्टर्सचा वापर बृजभूषण शरण सिंह दूरवरच्या भागांत आणि इतर राज्यांत आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी करत असतात. बृजभूषण शरण सिंह कुटुंबियांसोबत एक आलिशान आयुष्य जगतात.
