मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं
Chhagan Bhujbal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 7:04 PM

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता, शरद पवार यांच्या या दाव्यानंतर चर्चेला उधाण आलं. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे सुरू असतानाच आता भुजबळ यांनी यासंदर्भात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने सांगत आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात एक बैठक झाली होती, त्याचा व्हिडीओ देखील व्हायर झाला होता. त्याच्यामध्ये अशी माहिती समोर येत आहे की, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद द्यायचं, अजित पवार यांनी राज्य सांभाळायचं आणि प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं, असं ठरलं होतं अशी माहिती समोर येत आहे, असा प्रश्न यावेळी भुजबळ यांना पत्रकारांनी विचारला, या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

‘आता असंही आहे, प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने माहिती सांगतो, त्याला पुरावा काय? हे काही माहिती नाही. मला फक्त एवढं माहिती होतं, बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्यावेळी ही सर्व मंडळी तिथे एकत्रीत आली होती, आणि त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्या एकत्रित लढाव्यात, अशा प्रकारचं ठरलेलं होतं, हे मला अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्या पलिकडे काहीही ठरलं नाही.  सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, जर तसं काही असतं तर अजितदादा यांनी मला तसं सांगितलं असतं, माझ्याशी शेअर केलं असतं, असं फडणवीस म्हणाले, असं यावेळी भुजबळांनी सांगितलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की, जे या बैठकीला नव्हते, त्यांना काय माहिती, असाही प्रश्न यावेळी भुजबळ यांना विचारण्यात आला, याला देखील भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.  ही सर्वमंडळी कृषी प्रदर्शनासाठी एकत्र आली होती, त्यामुळे आम्ही तिथे असण्याचं काही कारणच नाही. अजितदादा हे बारामतीचे असल्यामुळे या कृषी प्रदर्शनामध्ये होते, अचानक तिकडे अशी काही मिटिंग होणार आहे, हेही कोणाला माहिती नव्हतं. आणि जर असं काही घडणार असतं तर तिकडचे दहा -पंधरा माणसं, इकडचे चार -पाच माणसं सोबत असताना बैठक घ्यायला पाहिजे होती. मग बोलायला पाहिजे होतं, मला वाटतं आता या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच निर्णय घेतील, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.