‘ठाकरे’ पाहिल्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

‘ठाकरे’ पाहिल्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पाहिला. “बाळासाहेब असते तर अमित शहांची शिवसेनेवर बोलण्याची हिंमत झाली नसती. शिवसेना संपणार  नाही. उद्धव ठाकरे समर्थपणे वारसा पुढे नेत आहेत.” अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

‘ठाकरे’ पाहिल्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

“बाळासाहेब असते तर अमित शहांची शिवसेनेवर बोलण्याची हिंमत झाली नसती. शिवसेना संपणार नाही,  उद्धव ठाकरे समर्थपणे वारसा पुढे नेते आहेत. चित्रपट ठाकरेंवर होता, त्यामुळे मी किंवा नारायण राणे यांना दाखवण्याचा संबंध नव्हता.” असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, “चित्रपट बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चित्रपटात दाखवलेल्या या सगळ्या आंदोलनात मी होतो, असेही भुजबळ म्हणाले.

शिवाय, कर्म संयोगाने पवार साहेब पंतप्रधानपदासाठी उमेदवार असले, तर सेना निश्चित पाठिंबा देईल, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

नाशिक शहरातील थिएटरमध्ये छगन भुजबळ यांनी ‘ठाकरे’ सिनेमा पाहिला. भुजबळ ज्यावेळी सिनेमा पाहायला आले, त्यावेळी थिएटरबाहेर शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत, त्यांचे स्वागत केले.

ठाकरे प्रदर्शित

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झालाय. महाराष्ट्रात आज ‘ठाकरे फिव्हर’ आहे. हा सिनेमा हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज झालाय. पण नेमका कोणत्या भाषेतला सिनेमा पाहावा, असा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. सिनेमाचं तिकीट बूक करताना गोंधळ उडाला असेल तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’

बाळासाहेबांचा आवाज ही एक त्यांची ओळख होती. हा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर मराठी सिनेमा पाहा. आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांच्या आवाजात हा सिनेमा डब करण्यात आलाय. चेतन सशीतल यांनी हुबेहूब बाळासाहेबांच्या आवाजाला न्याय दिलाय. त्यामुळे बाळासाहेबांना पाहिल्याचं फिल येतं.

नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणेच त्याच्या अभिनयाने मन जिंकलंय. या सिनेमातही नवाजचा अभिनय लाजवाब झालाय. या अभिनयासोबतच त्याच्या नैसर्गिक आवाजाचेही तुम्ही चाहते असाल तर हिंदी सिनेमा पाहा. हिंदी सिनेमात काही राष्ट्रीय मुद्दे दाखवण्यात आले आहेत, जे मराठी सिनेमात पाहायला मिळणार नाहीत.

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आवाजावरुन चाहते निराश झाले होते. त्यानंतर निर्मात्यांनी तातडीने चाहत्यांची भावना लक्षात घेतली आणि आवाजचं डबिंग सुरु केलं. हिंदी सिनेमातला आवाज डब केलेला नसला तरी मराठी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे एक ट्रीट आहे. ज्यांना बाळासाहेब जवळून पाहिलेले नाहीत, त्यांना मराठी सिनेमा पाहून बाळासाहेब समजतात.

बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते तिथून या चित्रपटाला सुरुवात होते.. मुंबईत मराठी माणसाला काडीची किंमत दिली जात नाही. परप्रांतीयांची मुंबईतील आवक वाढत चाललीये..त्यामुळे परप्रांतीयांना पुन्हा माघारी धाडून मराठी माणसाला रोजगार मिळावून द्यायचाच या जिद्दीने पेटून उठलेल्या बाळ ठाकरेचा बाळासाहेब ठाकरे कसा बनतो या प्रेरणादायी प्रवास ठाकरे या चित्रपटात दाखवण्यात आलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *