संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!

झडतीदरम्यान दोन पिस्तुले, मॅगझिनसह रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामध्ये 12 बोरची 632 जिवंत काडतुसे, 7.65 एमएमची 1,878 काडतुसे आणि 0.22 बोरची 3,840 जिवंत काडतुसे आहेत.

संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!
chhatrapati sambhajinagar police raid
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2026 | 6:55 PM

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हे मोठं घडामोडींचं शहर आहे. या शहरात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 90 च्या दहशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणाऱ्या बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. याच डॉनच्या घरी पोलिसांनी 10 जुलैच्या भल्या पहाटे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 5 कोटींची रोकड 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, सुमारे 500 जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ही कारवाई झाल्यानंतर संभाजीनगरात मोठा घात घडवून आणण्याचा बेत होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशकांत सातव यांनी छापेमारीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच पुढची योजना काय असेल, याविषयीही त्यांनी माहिती दिली.

रोख रक्कम आणि शस्त्रसाठा जप्त

शशिकांत सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलीस आयुक्तांना गोपनीय माहिती मिळाली होती की, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि शस्त्रसाठा ठेवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. झाडातीवेळी घरात शीला साळवे नावाची महिला उपस्थित होती. दोन पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली.
झाडाझतीदरम्यान 5 कोटी 26 लाख 29 हजार रुपयांची रोख रक्कम, सहा वेपन, तलवारी, चाकू, गुप्ती तसेच सोने-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला.

बाबा फरजान यांच्या घरावर छापा

तसेच, या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घर बाबा फरजान यांचं होतं. त्यांचे मागील महिन्यात मधुमेहाच्या आजारामुळे निधन झाले आहे. 1980 ते 1990 या कालावधीत ते कामगार युनियनचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली, असे शशिकांत सातव यांनी सांगितले.

एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त

झडतीदरम्यान दोन पिस्तुले, मॅगझिनसह रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामध्ये 12 बोरची 632 जिवंत काडतुसे, 7.65 एमएमची 1,878 काडतुसे आणि 0.22 बोरची 3,840 जिवंत काडतुसे आहेत. ही शस्त्रे आणि काडतुसे कोठून आणण्यात आली, त्यांचा वापर झाला आहे का, तसेच त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई 10 तारखेला करण्यात आली असून, त्याच रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करत असून, आर्मीकडून काही आम्हाला विचारात झाली तर त्यांना आम्ही माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us