AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉनच्या बंगल्यावर छापा… छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बाबा’च्या घरात सापडले घबाड… गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ

Raid on Baba Don House: 90 च्या दशकातील शहरात दहशत निर्माण करणाऱ्या बाबा डॉनच्या बंगल्यावर गुन्हे शाखेने काल भल्या पहाटेच छापा घातला. त्यावेळी मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईने शहरातील गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.

डॉनच्या बंगल्यावर छापा... छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बाबा'च्या घरात सापडले घबाड... गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ
डॉनच्या बंगल्यावर छापा... 'बाबा'च्या घरात सापडले घबाड
| Updated on: Jul 11, 2026 | 12:22 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही९ मराठी: शहरात 90 च्या दशकात बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. मिटमिटा, सिटी चौकात त्याचा दबदबा होता. त्याचे गेल्याच महिन्यात निधन झाले. या डॉनच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर आज भल्या पहाटेच गुन्हे शाखेने छापा घातला. पहाटे पाच वाजता झालेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. 21 तास पोलीस या बंगल्यात तळ ठोकून होते. पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता मिळाली. तर सोन्यासह इतर दागिनेही हस्तगत (Raid on Baba Don House Mitmita) करण्यात आल्याचे समजते.

नोटा मोजण्यासाठी पाच मशीन

शुक्रवारी भल्या पहाटेच गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरातील डॉनच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई 21 तास चालली. मध्यरात्री कारवाई संपली. दोन खोल्यांमध्ये बेहिशोबी रोकड आढळून आली. नोटा मोजण्यासाठी पोलिसांना पाच मशीन आणाव्या लागल्या. 500 रुपयांच्या नोटांची बंडलं पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईवेळी गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.

घातक शस्त्रे ही जप्त

कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने आणि घातक शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या डॉनचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी मोठी गोपनीयता राखण्यात आली होती. पोलिसांनी अगोदर दोन विश्वासून कर्मचाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

काय काय आढळले

शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यापासून दिवसभर सुरू होती कारवाई; शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती.

पडेगाव-मिटमिटा परिसरातील सुमारे एक एकर परिसरातील बंगल्याची सखोल झडती.

झडतीत 5 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी जप्त झाल्याची माहिती.

4 रायफल, सुमारे 500 जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू आढळल्याची माहिती.

रोकड मोजण्यासाठी 5 काउंटिंग मशीन मागवण्यात आल्याची माहिती

दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन पोलीस देणार माहिती

आरटीओकडे सापडले घबाड

दरम्यान उत्तर प्रदेशातील एका सेवानिवृत्त आरटीओकडे पोलिसांना घबाड सापडल्याचे समोर आले आहे. स्थानिक सतर्कता पथकाने घातलेल्या छाप्यात 13 किलो सोने, 1.62 कोटी नगद हस्तगत करण्यात आले. विशेष न्यायालयाकडून आरोपी ललित कुमार याच्याविरोधात शोध वॉरंट घेत पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी बेड आणि सोफ्यातून कोट्यवधीची नगद हस्तगत केली. तर एक भिंत फोडल्यानंतर त्यातून नोटा आणि सोने बाहेर आले. आरोपीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा