Khawadya Dongar : कुणाल आणि आई – वडिलांच्या निधनानंतर घरात काय होतंय? मोठी माहिती अखेर समोर

Khawadya Dongar : कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई - वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता त्यांच्या घराबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. याप्रकरणामुळे राज्या खळबळ उडाली आहे.

Khawadya Dongar : कुणाल आणि आई - वडिलांच्या निधनानंतर घरात काय होतंय? मोठी माहिती अखेर समोर
| Updated on: Aug 23, 2026 | 3:00 PM

Khawadya Dongar : कुणाल चांदगुडे आणि त्याचे आई वडील एकाच घरात राहत होते. अशात तिघांच्या निधनानंतर त्याचा पाळीव कुत्रा एकटाच पडला. त्यांच्या कुत्र्याचं नाव शेरु असं आहे. ज्या माणसांसोबत दिवस रात्र शेरु खेळत होता, आनंदी जगत होता, तेच तीन जण 21 ऑगस्ट पासून दिसत नसल्याने तो सतत भुंकत होता. कुणाल याच्या शेजारी राहणाऱ्यांनी देखील सांगितलं की, ‘शेरु सतत भुंकत आहे. त्याला बिस्किट दिलं तरी देखील तो खात नाही.’ अशात, कुत्र्याला रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतेला.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, शेरुची कुणाल चांदगुडे याच्या घरातून सुटका करण्यात आली आहे. आपला पेट लव्हर असोसिएशने शेरूची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. TV9 मराठीने कालपासून शेरू नावाच्या कुत्र्याची व्यथा दाखवल्यानंतर मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. शेरुची सुटका करण्यात येत आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून शेरु चांदगुडे कुटुंबियांसोबत राहत आहे. त्याचा सांभाळ स्वतः कुणाल करत होता. पण कुटुंबातील तिघांचं एकाच दिवशी निधन झाल्यानंतर शेरु पूर्णपणे एकटा पडलेला. अखेर कुणाल याचा आजोबांनी शेरुची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतलेला. पण शेरुचं रेस्कू झालं असून त्याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं.

कुणाल चांदगुडे प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. कुणाल याच्या  आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामुळे कुटुंबात वाद सुरुच होते.. अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, कुणाल याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते.

त्यामुळे कामाच्या निमित्ताने ते कायम बाहेरच असायचे. फार क्वचित ते घरी यायचे. आता देखील तीन महिन्यांनंतर ते घरी आलेले. पण ते घरी येताच वाद होण्यास सुरुवात झाली. आयफोनचे वाद इतक्या टोकाला पोहोचले की, कुणाल सोबत त्याच्या आई – वडिलांनी देखील अखेरचा श्वास घेतला. पण या धक्कादायक घटने मागे फक्त कुणालचा हट्ट कारणीभूत आहे की, दुसरं देखील कोणतं कारण याचा पोलीस तपास करत आहेत.  आता या प्रकरणात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us