AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचा दर प्रचंड घसरला, दुष्काळानंतर शेतकऱ्यापुढे नवं संकट, एका आठवड्यात किंमत थेट…

कांद्याच्या भावात आठवडाभरात जवळपास 900 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे कमी पाण्यामुळे टँकरने सिंचन करून कांद्याचे पीक जगवावे लागले असताना उत्पादन खर्चही वाढला आहे.

कांद्याचा दर प्रचंड घसरला, दुष्काळानंतर शेतकऱ्यापुढे नवं संकट, एका आठवड्यात किंमत थेट...
onion price dropped in maharashtraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 1:52 PM
Share

Onion Price Drop : दुष्काळाच्या संकटामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी सध्या हवालदील आहे. पेरणी केलेले पीक करपून गेलेय. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन सरकारकडून दिलं जातंय. राज्यात काही ठिकाणी थोडेफार पीक हाताशी आलेले आहे. या पिकाला तरी चांगला भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु याबाबतही शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच पाहायला मिळत आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या नाशिक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झालीय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पाकिस्तानी कांद्यामुळे फटका

नाशिकच्या जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याचे आगार म्हणून ओळखली जाते. याच बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा वाढल्याने दरावर दबाव निर्माण झाला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने निर्यातीवरही परिणाम होत आहे. याच कारणामुळे कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे निर्यातदार व्यापाऱ्याचे म्हणणे आहे.

कांद्याला नेमका भाव किती?

गेल्या मंगळवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल 5 हजार 700 रुपयांचा कमाल दर मिळाला होता. तोच दर आज 4 हजार 871 रुपयांपर्यंत खाली आला आहे. लासलगाव बाजार समितीत सुमारे 353 वाहनांमधून शेतकऱ्यांनी लाल कांदा विक्रीसाठी आणला होता. या लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 4 हजार 861 रुपये, किमान 1 हजार 500 रुपये, तर सरासरी 4 हजार ते 4 हजार 400 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला आहे.

सरकारने हस्तक्षेप करावा

कांद्याच्या भावात आठवडाभरात जवळपास 900 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे कमी पाण्यामुळे टँकरने सिंचन करून कांद्याचे पीक जगवावे लागले असताना उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारभावातून खर्चाची भरपाई करणेही कठीण होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. सरकारने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली जातेय.

Follow Us
सोन्या-चांदीच्या दरांना पुन्हा झळाळी; जळगावच्या सराफा बाजारात आज...
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांना पुन्हा झळाळी; जळगावच्या सराफा बाजारात आज मोठी दरवाढ, VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?