सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको… वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं

वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पत्नीपीडित पुरुषाने पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या. सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको," म्हणत यमराज्याला साकडं घातलं. महिला संरक्षण कायद्यांच्या कथित गैरवापराबाबत व्यथा मांडत, पुरुष आयोग, पुरुष दक्षता समिती आणि तक्रार निवारण कक्षाची मागणी व्यक्तीने केली आहे.

सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको... वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं
| Updated on: Jun 28, 2026 | 2:59 PM

हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत आणि प्रत्येक सणाचं त्याचं वेगळं महत्त्व आहे. गेल्या असंख्या वर्षांपासून ज्या परंपरा चालत आल्या आहेत, त्या जपण्याचं कार्य आजची पिढी करत आहे. उद्या राज्यभर महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करणार आहेत. हिंदू संस्कृतीत या सणाला फार महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी हा सण फार महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करत सात जन्म हाच पती मिळावा, अशी प्रार्थना महिलांनी करतात. पण अनेक पुरुषांनी तर, वटपौर्णिमेपूर्वीत वडाला 7, 11, 21 नाही तर, 108 फेऱ्या मारत ‘सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको…’, म्हणून यमराज्याला घातलं साकडं घातलं आहे.

सध्या सर्वत्र वटपौर्णिमेची तयारी सुरु असताना, पौर्णिमेच्या एक दिवस आधी, छत्रपती संभाजीनगरमध्ये याच्या अगदी विरुद्ध चित्र पाहायला मिळालं. पत्नीपीडित असल्याचा दावा करणाऱ्या पुरुषांनी करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात एकत्र येत पिंपळाच्या झाडाला 108 उलट्या प्रदक्षिणा घातल्या आणि “सात जन्म काय, सात सेकंदही हीच पत्नी नको,” अशी प्रार्थना केली.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी देखील कोणतीही आंदोलनाची भूमिका नसून, आपल्या व्यथा समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला. महिला सबलीकरणासाठी करण्यात आलेल्या काही कायद्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप या पुरुषांनी यावेळी केला. खोट्या तक्रारींच्या आधारे पतीसह त्याच्या कुटुंबीयांनाही गुन्ह्यांमध्ये गोवलं जात असल्यानं अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुरुषांच्या समस्यांकडेही सरकार, न्यायव्यवस्था आणि समाजाने गांभीर्याने पाहावं, अशी त्यांची मागणी आहे.

कार्यक्रमादरम्यान पिंपळ वृक्षाची पूजा करण्यात आली. तसेच न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. “स्त्रियांसाठी वटसावित्री, तर पुरुषांसाठी पिंपळ पौर्णिमा” अशी संकल्पना मांडत पुरुषांनाही न्याय मिळावा आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या जाव्यात, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी पुरुष आयोगाची स्थापना, पुरुष दक्षता समिती आणि पुरुष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी आणि पत्नी पीडित असल्याचा दावा करणारे अनेक पुरुष उपस्थित होते.

 

Follow Us