Breaking News: ज्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली ती आता होणारच नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आधीच राजीनामा

| Updated on: Jun 29, 2022 | 10:51 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर सुप्रीम कोर्टात तीन तास युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. हा निकाल ठाकरे सरकारच्या विरोधात गेला. यामुळे ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार होते.

Breaking News: ज्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली ती आता होणारच नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आधीच राजीनामा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : विश्वासदर्शक ठरावाला दिलेल्या आव्हानावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारविरोधात निर्णय देत उद्या बहुमत चाचणी (Majority Test) घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत बहुमत चाचणी होणार होती. मात्र ज्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली ती बहुमत चाचणी होण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resign) दिला. फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर सुप्रीम कोर्टात तीन तास युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. हा निकाल ठाकरे सरकारच्या विरोधात गेला. यामुळे ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार होते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून राजीनाम्याची घोषणा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या संवादातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ‘मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोय आणि माझ्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. मी पुन्हा येईन असं बोललं नव्हतो, तरीही आलो. जिथं जायचं नव्हतं तिथे गेलो होतो. आता मी तुमच्यासोबत आहे. सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार. शासकीय यंत्रणेचं सचिव पोलीस कलेक्टर सर्वांचं ऋण व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नवीन वाटचाल सुरू करणार

मी म्हटलं मी आलोही होतो अनपेक्षितपणे, जातोही अनपेक्षितपणे. जातो म्हणजे कुठे जात नाहीये. मी इथेच राहणार. पुन्हा शिवसेना भवनात बसणार सैनिकांना भेटणार. नवीन भरारी मारणाऱ्या लोकांना सोबत घेणार. नवीन वाटचाल सुरू करणार. शिवसेना तीच आहे, आपलीच आहे. शिवसेना कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ना शिवसेना हिरावून घेऊ शकत ना तुमच्यापासून ठाकरेपासून हिरावून घेऊ शकत, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. (Chief Minister Uddhav Thackeray resigns before the majority test after the Supreme Court decision)