Uddhav Thackeray: काही हातभट्टीवाल्यांनाही मंत्री केलं, उद्धव ठाकरेंच्या भाषणात पुन्हा बंडखोर आमदारांबद्दल खेद

उद्धव ठाकरे म्हणाले, पण, ज्यांना दिलं ते नाराज. ज्यांना नाही दिल ते सोबत आहे. हे हिमतीने सोबत आहे. याला म्हणतात माणूसकी. शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक, हे आपलं नातं आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे.

Uddhav Thackeray: काही हातभट्टीवाल्यांनाही मंत्री केलं, उद्धव ठाकरेंच्या भाषणात पुन्हा बंडखोर आमदारांबद्दल खेद
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 29, 2022 | 10:07 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मी लहानपणापासून शिवसेना पाहतोय. रिक्षावाले टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टी वाले. त्यांनी शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक, आमदार (MLAs), खासदार (MPs), मंत्री बनवलं. माणसं मोठी झाली. मोठी झाल्यानंतर ज्यांना मोठं केलं ते विसरायला लागली. ज्यांना मोठं केलं त्यांना सत्ता आल्यानंतर जे काही देता येईल ते शक्य होतं ते दिलं. आजही ज्यांना देता येईल ते दिलं. ते लोकं नाराज. काही हातभट्टीवाल्यांना मंत्री केलं. परंतु, बंडखोर (rebellious) आमदारांबद्दल ठाकरे यांनी खेद व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, गेले चार-पाच दिवस मातोश्रीला आल्यावर लोक येत आहे. साधी माणसं येत आहेत. साहेब काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, यासाठी आश्वस्त करत आहेत.

शिवसैनिकांच्या हिमतीवर सेना मजबूत

उद्धव ठाकरे म्हणाले, पण, ज्यांना दिलं ते नाराज. ज्यांना नाही दिल ते सोबत आहे. हे हिमतीने सोबत आहे. याला म्हणतात माणूसकी. शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक, हे आपलं नातं आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे. आजही न्याय देवतेने निकाल दिला आहे. न्याय देवता म्हटल्यावर न्याय देवतेचा निकाल मान्य असायलाच पाहिजे. आपण आपली बाजू मांडली पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट, जसं कोरोना टेस्ट तसं. हा एक भाग. राज्यपाल महोदयांनी फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे फक्त चार मंत्री

मंत्रीमंडळाच्या बैठकीत चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकी कुठं गेलेत. तुम्हाला माहीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनं विरोध केला नाही. पण, ज्यांना शिवसेनेनं मोठ केलं त्यांनी नाराज केलं. शिवसेनेला 56 वर्षे झाली. ज्यांना मोठ केलं. ते नाराज आहेत. गेली चार-पाच दिवस साधी माणसं येत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज ज्यांना काही दिलं नाही ते सोबत असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें