अजित पवार यांचं वक्तव्य बरोबर म्हणत राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी उर्फ शालीग्राम असा उल्लेख कुणाचा केला?

| Updated on: Jan 02, 2023 | 5:56 PM

अजित पवार यांचे विधान बरोबर असल्याचे म्हणत रूपाली पाटील यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला आहे.

अजित पवार यांचं वक्तव्य बरोबर म्हणत राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी उर्फ शालीग्राम असा उल्लेख कुणाचा केला?
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून अजित पवार यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका करत हल्लाबोल केला होता. यामध्ये अजित पवार यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांचे विधान बरोबर असून तुषार भोसले यांच्यावर जहरी टीका केली आहे. तुषार भोसले उर्फ शालीग्राम यांनी संभाजी महाराज यांचा इतिहास वाचवा असं रूपाली पाटील म्हणाल्या. राज्यपाल यांनी जेव्हा वक्तव्य केलं होतं तेव्हा हे भाजपववाले कुठं गेले होते असा सवाल उपस्थित करत रूपाली पाटील यांनी भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

रूपाली पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना अजित पवार यांचे वक्तव्य बरोबर आहे. तुसार भोसले उर्फ शालीग्राम असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली आहे.

तुषार भोसले यांनी आधी संभाजी महाराजांचा इतिहास वाचावा, राज्यपालांनी जेव्हा वक्तव्य केलं होतं तेव्हा हे भाजपवाले कुठं गेले होते, यांची जीभ छाटली होती का ? असा सवाल रूपाली पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

रुपाली पाटील यांनी भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल करत असतांना अजित पवार यांना हे सरकार घाबरलंय असंही रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

भाजप जाती-धर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजी महाराजांच्या सोबत सगळ्या जातीधर्माचे लोक होते असेही रूपाली पाटील यांनी म्हंटलं आहे.

शिंदे गटाचा प्रवक्ता मुर्ख आहे असं म्हणत अजित पवार जे बोलले ते स्वराज्यरक्षक होते हे योग्य आहे असं ठासून रूपाली पाटील यांनी म्हंटले आहे.