AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis : आज अखेर 20 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत. त्या शिवाय ते UPI पेमेंटवर शुल्क आकारलं जाणार त्यावरही बोलले आहेत.

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis Image Credit source: PTI
| Updated on: Sep 17, 2026 | 10:13 AM
Share

आज अखेर 20 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत. “मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना आवाहन केलं होतं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. एक मागणी कायदेशीर अडचण असल्यामुळे मान्य केली नाही, त्या बद्दल त्यांना सांगितलं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “सबकमिटीने त्यांना जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु. त्या आश्वासनांकरीता बैठक घेणं, ती पूर्ण करणं ते सगळं आम्ही करु. यात प्रशासकीय निर्णय आहेत. निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे. आमचे दरवाजे उघडे आहेत. मराठासमाजा करता जेवढे निर्णय आम्ही घेतले, तेवढे निर्णय कोणी केले नाहीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“जे काही मिळालं ते आमच्या काळात मिळालं आहे. उपोषण संपलं याचा मला आनंद आहे. विखे पाटील, प्रसाद लाड, एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. या सगळ्यांनी खूप मदत केली. कुठल्या सणात विघ्न ने येता हे आंदोलन संपलं याचा आनंद आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.”माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढिदवस आहे. ते कधीच जन्मदिवस साजरा करत नाहीत. त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही विविध ठिकाणी सेवा करायची ठरवलं आहे. या सेवेच्या माध्यमातून एक महिना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी पंतप्रधान मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची ज्या पद्धतीने आगेकूच सुरु आहे, विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करु. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून जनतेची सेवा विविध प्रकारे करणार आहोत. जनतेला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करु” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

UPI पेमेंटवर शुल्क आकारण्यावर फडणवीस काय म्हणाले?

यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारलं जाणार आहे. हा छुपा कर असल्याचं म्हटलं जातय. मोदींनी पाठिचा कणा ताठ ठेवावा अशी टीका राहुल गांधी यांनी केली. “सर्वप्रथम राहुल गांधींना पाठिचा कणा आहे का, हे बघावं लागेल. याच कारण ते सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात संध्याकाळी एक बोलतात. जे लिहून दिलय ते वाचतात. त्यांना त्याची माहिती नसते” असं राहुल गांधींच्या टिकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. “यूपीआय संदर्भात केंद्र सरकारने अधिकृतपणे खुलासा केला आहे. वारंवार तो खुलासा करण्याची आवश्यकता नाही. हे टीका करणारे जे आहेत, जगातलं पेमेंट गेट वे भारताने तयार केलं. जग आज आपलं यूपीआय घेऊन चाललं आहे. आज अनेक देश आपलं यूपीआय वापरत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे सबसिडी थेट खात्यात जमा होते. त्यामुळे भ्रष्टाचार संपला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान