रायगडच्या दिवेआगरमधील घटनेनंतर CM फडणवीस मदतीला धावले, 8 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला काय आदेश दिले?
रायगडच्या दिवेआगरमधील घटनेनंतर CM फडणवीस मदतीला धावले आहेत. त्यानंतर फडणवीसांनी 8 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले.

रायगडच्या दिवेआगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सहलीला गेलेल्या एकूण 8 विद्यार्थ्यांचा गुरुवारी सायंकाळी समुद्रात बुडून मृत्यू झालाय. 8 जणांच्या मृत्यूने त्यांच्या पालकांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी दगावल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मंत्री आदिती तटकरे या रात्रीच घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या दु:खद घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त दुसरीकडे आळंदीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
CM देवेंद्र फडणवीसांनी काय आदेश दिले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रायगडच्या जिल्ह्यात दिवेआगर येथील समुद्रकिनारी पर्यटनासाठी विनर्स अकॅडमीचे काही विद्यार्थी आले होते. यातील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील आहे. त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत’. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी विनर्स अॅकडमीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंत्यत दु:खदायक आणि दुर्दैवी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजी. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पोस्ट जशीच्या तशी
सुनेत्रा पवार म्हणाल्या, रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत समुद्रात बुडून आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं मन हेलावून गेलं. घटनेची माहिती मिळताच मी रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. बचावकार्य, मदतकार्य आणि पुढील आवश्यक कार्यवाही तातडीनं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित असून आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचं बळ देवो’.
