Devendra Fadnavis: डीएमके ते शरद पवार.. डिलिमिटेशनला कुणाकुणाचा पाठिंबा? CM फडणवीसांनी आकडाच सांगितला!

महिला आरक्षण द्यायचे असेल तर संविधान संशोधनानुसार डी-लिमिटेशनचा कायदा पास करावाच लागेल. त्र आता त्याला विरोध करत आहेत. आज त्याला संविधानविरोधी म्हटलं जात आहे. मात्र ह्यांनी संविधान वाचलं आहे का? यांनी पहिल्यांदा संविधान वाचले पाहिजे," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

Devendra Fadnavis: डीएमके ते शरद पवार.. डिलिमिटेशनला कुणाकुणाचा पाठिंबा? CM फडणवीसांनी आकडाच सांगितला!
Devendra Fadnavis
| Updated on: Nov 29, 2026 | 2:17 PM

CM Devendra Fadnavis:  “डिलिमिटेशनला विरोध म्हणजे लबाडी आहे. २०२३ ला नारीशक्ती वंदन विधेयकाला या सर्वांनी पाठिंबा देऊन या सर्वानी ते एकमताने मान्य केले होते. त्या विधेयकात काय होते? महिलांना ३३ टक्के आरक्षण अन् डिलिमिटेशन त्याच बिलामध्ये डिलिमिटेशन करुन महिलांना आरक्षण हे स्पष्टपणे लिहिले होते. त्यावेळी यापैकी एकानेही का विरोध केला नाही?” असा सवाल करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिलिमिटेशनवरुन विरोधकांवर तोफ डागली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Loading...

“२०२३ ला नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्या विधेयकात महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि डी-लिमिटेशन करून आरक्षण देण्याचे स्पष्टपणे लिहिले होते. त्यावेळी एकानेही डी-लिमिटेशनला विरोध केला नाही, सर्वांनी डी-लिमिटेशनसह आरक्षण स्वीकारले होते. आता महिला आरक्षण द्यायचे असेल तर संविधान संशोधनानुसार डी-लिमिटेशनचा कायदा पास करावाच लागेल. त्र आता त्याला विरोध करत आहेत. आज त्याला संविधानविरोधी म्हटलं जात आहे. मात्र ह्यांनी संविधान वाचलं आहे का? यांनी पहिल्यांदा संविधान वाचले पाहिजे,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तसेच  “सर्व राज्यांना सरसकट ५० टक्के जागा वाढवून दिल्यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांचा फायदा झाला, नुकसान झाले नाही. दक्षिणेतील १२० खासदारांपैकी ७५ खासदारांनी उघडपणे या बिलाला पाठिंबा दिला आहे. डीएमकेने पाठिंबा दिला, तसेच शरद पवार यांच्या पक्षानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रोज सकाळी येऊन भोंगा वाजवणाऱ्यांना माझा सवाल आहे, २०२३ ला तुम्ही झोपले होते का? त्यावेळी डी-लिमिटेशनला विरोध का नाही केला?”  असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच “तुम्हाला त्यावेळी वाटले महिला आरक्षण लागू होणारच नाही. मात्र ते मोदीजी आहेत त्यांनी ठरवलं महिला आरक्षण आणायचे म्हणजे आणायचे. आता तुम्हाला समजत नाही महिलाआरक्षण कसे थांबवायचे त्यामुळे डिलिमिटेशनच्या आड लपत आहात. पण तुम्ही कितीही लपलात तरी या देशात महिला आरक्षण लागू होईल. ३३ टक्के महिला लोकसभेत आणि विधानसभेत प्रवेश करतीलच,” असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us