Kashmiri Pandits : काश्मिरी पंडितांसाठी शिवसेना मैदानात, वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. असेही ते म्हणाले.

Kashmiri Pandits : काश्मिरी पंडितांसाठी शिवसेना मैदानात, वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची  ग्वाही
काश्मिरी पंडितांसाठी शिवसेना मैदानात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2022 | 10:46 PM

मुंबई : कश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज येथे दिली. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग’ (Hindu Target Killings) कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात तक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. असेही ते म्हणाले.

शिवसेना तुमच्यामागे ठामपणी उभी

याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. 1995 साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वान्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

अनेक दिवसांपासून काश्मिरात तणाव

गेल्या अनेक दिवासांपासून काश्मिरात तणावाचं वातावरण आहे. सुरूवातील राहुल भट्ट आणि दोन दिवसांपूर्वीच विजयकुमार या हिंदू बँक मॅनेजरची काश्मिरी खोऱ्यात हत्या झाली आहे. तसेच एक शिक्षिकेलाही गोळी मारण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणचे हिंदूही आता चांगलेच संतापले आहेत. देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शिवसेनेही आता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.