AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बीडमध्ये चप्पलफेक, लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! बीडमध्ये चप्पलफेक, लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
Hake vs Pandit
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 25, 2025 | 6:28 PM
Share

बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर या दोन नेत्यांमधील वादाला सुरुवात झाली होती. हाके यांच्या विधानाचा निषेध करत पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते, त्यामुळे हा वाद आणखी पेटला होता.

गेवराईमध्ये राडा

आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत चलो मुंबईचे बॅनर लावले होते. त्यामुळे हाकेंनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, तसेच त्यांनी हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. त्यानंतर पंडित यांना आव्हान देत आज लक्ष्मण हाके गेवराईत आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला फेकत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.

हाके यांचं आमदार पंडित यांना आव्हान

यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी, ‘कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. बास झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे. तुझ्या गावात आलो आहेत 500 किलोमीटर अंतरावरून. दम असेल तर बाहेर ये’ असं आव्हान आमदार विजयसिंह पंडित यांना दिलं आहे.

पंडित यांनी केली होती हाकेंवर टीका

याआधी विजयसिंह पंडित यांनीही लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका केली होती. पंडित यांनी, ‘लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र हा माणूस आहे. आमच्या मतदार संघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. याने या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता. त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालं आहे. हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा रिचार्जवाला डॉग आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे, ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत’ असं विधान केलं होतं.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?