भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला, असा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा  भंग, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 3:53 PM

पुणे | 19 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी ( 16 मार्च) रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला, असा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

निवडणुकीची तारखा जाहीर झाली की आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू होते. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असते. या काळात अनेक राजकीय कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईही होऊ शकते. मात्र आता भाजपानेच आचारसंहिता भंग केल्याचा आरोप धंगेकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.

काय आहे धंगेकर यांचा आरोप ?

हे सुद्धा वाचा

पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आचार संहिता म्हणजे काय ?

देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसबा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये संसद आणि राज्य विधानमंडळांच्या मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्याचे पालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. आचारसंहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. आचार संहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे.

आचार संहिता कधीपर्यंत असते प्रभावी ?

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते. यावेळी आचारसंहिता आजपासून (16 मार्च 2024) लागू होईल. कारण आज निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आचारसंहिता समाप्त होते.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.