राष्ट्रवादीच्या डिमिलिटेशनवरील भूमिकेने इंडिया आघाडीला धक्का; काँग्रेसने सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, शरद पवारसाहेबांना 85 व्या वर्षी…

राष्ट्रवादीच्या डिमिलिटेशनवरील भूमिकेने इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. काँग्रेसने पोस्ट करत शरद पवारा सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, शरद पवार साहेबांना 85 व्या वर्षी...

राष्ट्रवादीच्या डिमिलिटेशनवरील भूमिकेने इंडिया आघाडीला धक्का; काँग्रेसने सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, शरद पवारसाहेबांना 85 व्या वर्षी...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 8:22 AM

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनात भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी काल डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधायक वाचल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने डिलिमिटेशनला जाहीर विरोध केला आहे. परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे डिलिमिटेशनवरून संभ्रम आणखी वाढला आहे. आता काँग्रेसने एक पोस्ट करत सगळंच बाहेर काढलं आहे.

काँग्रेसची पोस्ट जशीच्या तशी 

Loading...

महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने म्हटलं की, शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली.

 

‘काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत, अशा शब्दात काँग्रेसने सुनावलं. तसेच काँग्रेसने एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदतीची आठवून करून दिली आहे. ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता, अशा शब्दात काँग्रेसने राष्ट्रवादीला मदतीची आठवून करून दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us