काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण? सर्वात मोठी बातमी समोर!

मोठी बातमी समोर येत आहे, आता लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्षपदासाठी चार नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण? सर्वात मोठी बातमी समोर!
| Updated on: Feb 12, 2025 | 7:14 PM

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. महायुतीला मोठा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला. महाविकास आघाडीचे तीन पक्ष काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. काँग्रेसने अवघ्या 16 जागाच जिंकल्या. या पराभवानंतर आता काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकते मिळत आहेत. या निवडणुकांपूर्वी काँग्रेस हायकमांड मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो. पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र यात काँग्रेसला फार यश मिळवता आलं नाही. खुद्द नाना पटोले यांचा देखील विधानसभेत निसटता विजय झाला. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी या चार नावाची चर्चा?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच काँग्रेसकडून नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाण्याची शक्यात आहे. काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या हायकमांडमध्ये चार नेत्यांच्या नावावर अंतिम चर्चा सुरू आहे. यामध्ये  सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख आणि हर्षवर्धन सपकाळ या नावांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सध्या ज्या नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे, त्यावरू असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पक्षाकडून एखाद्या तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.