AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर

Baramati By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे.

Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर
Sunetra Pawar
| Updated on: Apr 09, 2026 | 12:49 PM
Share

बारामती विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी आज सकाळपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळी यांची भेट घेतली. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांना विनंती केली. त्याशिवाय शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील अशीच अपेक्षा व्यक्त केली. आता त्यांच्या शिष्टाईला यश येताना दिसत आहे. काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार आहे.

काँग्रेस आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी रमेश चेन्नीथला यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे. रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. आकाश मोरे यांची उमेदवारी काँग्रेस मागे घेणार असल्याने सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. पण निवडणुकीला बिनविरोध म्हणता येणार नाही. कारण अपक्ष उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात आहेत.

आकाश मोरे काय म्हणाले?

अजित पवार विमान अपघात प्रकरणात राज्य सरकारने गुन्हा दाखल केल्यास उमेदवारी मागे घेऊ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. बारामती निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे टीव्ही 9 मराठीशी बोलले. “मी कालपासून लोकांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या आहेत. ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण आहे. निवडणूक काँग्रेस लढतेय त्याचा आनंद आहे. आतापर्यंत तरी मी उमेदवार आहे” असं आकाश मोरे म्हणाले.

दादांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे ही निवडणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय