AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला. आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा... काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं
Sunetra PawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 12:08 PM
Share

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवारांपासून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसला बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रयत्नानंतर अखेर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसं सुतोवाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“या निर्णायापूर्वी दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करुन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरु होईल. आमची भावना म्हणण्यापेक्षा विशेष करुन मला तर नाही पण प्रदेश अध्यक्षांना अनेकांचे फोन आलेत. सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री जे आता निवडणुक लढत आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांचाही फोन होता. एकूण तिथली परिस्थती पाहता एकूण, सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता, तिकडे निवडणुकीमधून पुढे जाणं हे थांबावं अशा प्रकारची भूमिका दिसली. आमच्या सर्वांचे एकमत झालेलं आहे”, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा दिल्लीतुन हर्षवर्धन सपकाळांशी संवाद

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत संवाद साधत आहेत. रमेश चेन्निथला हर्षवर्धन सपकाळ आणि दिल्लीतील नेत्यांची चर्चा सुरू आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेण्याच्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही. बारामती पोटनिवडणूकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉग्रेसमध्येच असमन्वय आहे. कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोट निवडणूकीतून माघारीची घोषणा केली. सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉग्रेसचे वरिष्ठ नेते यांची चर्चा सुरु आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?