AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात..

IMD weather forecast : राज्यात काही दिवसांपूर्वीच पाऊस धुमाकूळ घालताना दिसला. त्यामध्येच आता काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात..
Weather Update
| Updated on: Jul 12, 2026 | 7:27 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठा बदल होत आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस सर्वत्र होता. आता पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागात पाऊस हजेरी लावेल. सोमवारी विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. मराठवाड्यातही काही भागात पाऊस कोसळेल. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा श्रीनगर, शाहजहानपूर, रोहतक, मुझफ्फरपूर, बस्ती येथे सक्रिय आहे. वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8 किलोमीटर उंचीवर आहे. तेलंगणापासून कर्नाटकपर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत 3.1 किमोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात विश्रांतीनंतर धो धो पावसाला सुरूवात होईल. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात थेट अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पाऊस अनेक भागात झाला.

पर्वतीय प्रदेशात भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, यादरम्यानच नागरिकांना मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. पूर्व आणि मध्य भारतात आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाने तिकडे चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. लवकरच अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचा अंदाज आहे.

एल निनोचा प्रभाव मॉन्सूनच्या पावसावर असण्याचा अंदाज होता. ज्यामुळे एक तर कमी पाऊस किंवा अति पाऊस पडण्याचा अंदाज होता. त्यामध्येच एल निनोचा प्रभाव असूनही भारतात चांगल्या मॉन्सूनचा पाऊस कोसळताना दिसत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आता अजून पावसाची अपेक्षा आहे. दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे