AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईमध्ये कोसळधार! मायानगरीत 5 दिवसांत किती पडला पाऊस? किती झाडे पडली? धक्कादायक आकडेवारी समोर

mumbai rain update : मुंबईत सलग 7 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसादरम्यान अनेक झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

मुंबईमध्ये कोसळधार! मायानगरीत 5 दिवसांत किती पडला पाऊस? किती झाडे पडली? धक्कादायक आकडेवारी समोर
| Updated on: Jul 07, 2026 | 8:30 AM
Share

मुंबईत मागील 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसासहित ठिकठिकाणी झाड पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकीकडे मुंबईवर मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. तर दुसरीकडे नागरिकांवर झाड, फांद्या पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. झाड कोसळण्याच्या घटनेने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींचा झाड पडझडीमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरीत सहा दिवसांत मुसळधार पावसासहित झाड पडण्याच्या रेकॉर्ड ब्रेक घटना घडल्या आहेत. यामुळे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मुंबईत 6 दिवसांत मुंबईत तीन वर्षांच्या पावसाळ्यातील एकूण झाड पडण्याच्या घटनांनाही मागे टाकलंय. मुंबई शहरात जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत तब्बल १ हजार १०० झाडे कोसळली आहेत. तर २०२५ च्या संपूर्ण पावसाळ्यातील ८५५ झाड कोसळली होती. तसेच २०२४ मधील ६५३ आणि २०२३ मधील ६८७ झाड पडण्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे ५२३ झाडे पडली आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

मुंबईत सलग तीन दिवस मुसळधार पाऊस आणि ताशी ७० ते ७८ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) म्हटलंय.

विभागनिहाय झाड पडण्याच्या घटना (६ जुलै)

पश्चिम उपनगर – १८८ शहर विभाग – १८५ पूर्व उपनगर – १५० एकूण – ५२३

जुलैमधील दिवसनिहाय झाड पडण्याच्या घटना

१ जुलै – ९० २ जुलै – ९९ ३ जुलै – १२१ ४ जुलै – १०३ ५ जुलै – १६४ ६ जुलै – ५२३

पाच दिवसांत जुलैच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मुंबईत जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावली.जुलै महिन्याच्या ३१ दिवसांत मिळून पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या पाच दिवसांत पडलाय. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात सरासरीहून ५ टक्के तर कुलाबा येथे १२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून महिन्यातील तूटही भरून निघाली आहे. जूनच्या पंधरवड्यात सांताक्रुझ येथे १२.९ मिमी तर कुलाबा येथे केवळ ४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात जुलैमध्ये सरासरी ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. १ जुलै ते ६ जुलै सकाळी ८:३० पर्यंत सांताक्रुझ येथे ८९९. २ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार