AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढगफुटी होणार, थेट 300 मिमि, आजचा दिवस मोठ्या संकटाचा, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर..

Nashik Cloudburst : राज्यात आजही पावसाचा हाहाकार बघायला मिळेल. तूफान पाऊस गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज नाशिकला रेड अलर्ट जारी केला. यासोबतच ढगफुटीचा मोठा इशारा दिला.

ढगफुटी होणार, थेट 300 मिमि, आजचा दिवस मोठ्या संकटाचा, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर..
Cloudburst
| Updated on: Jul 07, 2026 | 7:14 AM
Share

राज्यात पावसाने कहर केला. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली. गेल्या चार दिवसात पावसाने थैमान घातले. आज भारतीय हवामान विभागाकडून नाशिकला मोठा इशारा देण्यात आला. आज नाशिकमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून सातत्याने घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. काल मुंबई पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. नाशिकमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. गडकिल्ल्यांवर जाण्याचे टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. धबधब्यांवर पोलिस कार्यरत असणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटी होण्याच्या अंदाज आहे.

यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना जाहीर केल्या. ढगफुटीचा अंदाज असून 300 मिमी पाऊस पडण्याच्या अंदाज आहे. नाशिकमधील आज सर्व पर्यटक स्थळे बंद राहणार आहेत. पुणे, नाशिक, पालघर येथे भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. बंगालच्या उपसागरतील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले.पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यात 8 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरण. किल्ले आदी 48 तास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने घेतला निर्णय. पोलिस प्रशासन, वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा राहणार बंदोबस्त. पर्यटकांना या स्थळांवर मज्जाव करण्यात येईल. कायद्याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत होणार गुन्हा दाखल होणार.

फक्त नाशिकच नाशिक तर अनेक भागात आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाचे नाशिक जिल्ह्याकडे लक्ष आहे. आज तिथे मोठा धोका आहे. काल कोसळलेल्या दरडीनंतर पुन्हा एकदा मुंबई पुणे महामार्ग सुरू करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीत पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, पुन्हा मुसळधार सरींची शक्यता. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर कल्याण-डोंबिवलीत आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे