AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Deshmukh: पक्षफुटीच्या घटनाक्रमावर नितीन देशमुखांचा मोठा दावा; असीम सरोदेंना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले- आधीच सांगितला होतं…

Nitin Deshmukh Reply to Asim Sarode Statement: असीम सरोदेंच्या वक्तव्यावर नितीन देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षफुटीच्या घटनाक्रमावर मोठा दावा केला आहे.

Nitin Deshmukh: पक्षफुटीच्या घटनाक्रमावर नितीन देशमुखांचा मोठा दावा; असीम सरोदेंना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले- आधीच सांगितला होतं...
Nitin Deshmukh Recalls Events During Maharashtra Political Crisis
| Updated on: Nov 25, 2026 | 10:50 PM
Share

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील पक्षफुटीच्या घटनाक्रमावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्याकडे पक्षफुटीच्या काळातील महत्त्वाची माहिती होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता तर न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करता आले असते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नितीन देशमुख यांनी असीम सरोदेंच्या वक्तव्याला उत्तर देताना आपण त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आधीच सार्वजनिक केली होती, असं सांगितलं. सुरत येथे असतानाच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात काय घडलं, याची माहिती आपण गुवाहाटीहून परतल्यानंतर दिली होती, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

गुवाहाटीहून परतल्यानंतर अकोला आणि मुंबई येथे पत्रकार परिषदा घेऊन आपण संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. सुरत येथे नेमकं काय घडलं, आपल्याबाबत कोणत्या बातम्या पसरवण्यात आल्या आणि पक्षफुटीच्या काळात कोणत्या घडामोडी सुरू होत्या, याबाबत आपण त्यावेळीच भूमिका मांडली होती, असा दावा नितीन देशमुख यांनी केला.

मात्र त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत होत्या. त्यामुळे आपण पत्रकार परिषदेत मांडलेला घटनाक्रम कदाचित अ‍ॅड. असीम सरोदेंच्या लक्षात आला नसावा, असंही देशमुख म्हणाले. शिवसेनेतील फुटीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून न्यायालयीन लढाई आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरू आहेत. असीम सरोदेंच्या वक्तव्यामुळे या प्रकरणातील तत्कालीन घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यावर नितीन देशमुख यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता या मुद्द्यावर नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार