AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणाचा संपूर्ण जगाला मोठा हादरा; होर्मुजची सामुद्रधुनी बंद, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ होणार?

hormuz strait news : इराणने पुन्हा संपूर्ण जगाला मोठा झटका दिलाय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे.

इराणाचा संपूर्ण जगाला मोठा हादरा; होर्मुजची सामुद्रधुनी बंद, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ होणार?
| Updated on: Jul 12, 2026 | 7:39 AM
Share

इराणने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठा झटका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बेकायदेशीर मार्गाने जाणाऱ्या जहाजावर गोळीबार केला आहे. त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली. दुसरीकडे अमेरिकेने इराणवर तिसऱ्यांदा हल्ला केला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप आणि लेबनॉन, गाझामध्ये इस्त्रायलच्या लष्करी कारवाया करून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर अमेरिकेनेही इराणवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगातील बहुतांश देशांसाठी कच्च्या तेलाच्या खरेदी-विक्रीनंतर होर्मुजची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील 20 टक्के कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने केला जातो. पण हाच मार्ग पुन्हा बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जगातील बहुतांश देशात तेल, एलपीजी-एलएनजीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. अनेक देशांतील लोकांना पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील. अमेरिका-इराणच्या तणावाचा परिणामा संपूर्ण जगाला भोगावा लागण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे सेंट्रल कमांडनुसार, इराणवर शनिवारी सायंकाळी पुन्हा हल्ले करण्यात आले. इराणने एका जहाजावर हल्ला केला होता. त्यामुळे अमेरिकेलाही हल्ला करावा लागला. त्यामुळे आठवड्याभरात अमेरिकेने इराणवर तिसरा हल्ला केला आहे. अमेरिकेच्या सैन्याने जास्क, चाबहार बंदर, केशम बेटावर हल्ले केले.

हल्ले केल्यानंतर दोघांनी एकमेकांना युद्धासाठी ललकारलं आहे. अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारानंतर पहिल्यांदा मोजतबा खामेनेई यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी वडिलांचा हत्येचा बदला घेणार असल्याचे अधोरेखित केले. दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीही इराणला गंभीर परिणामाची धमकी दिली आहे. अमेरिकने इराणला पुन्हा एकदा कराराचे पालन करण्याची संधी दिली आहे. परंतु त्यांनी कराराचे उल्लंघन केले, तर त्यांनी दयेची अपेक्षा करू नये, असे अमेरिकेने म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....