AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: पुण्यातील MPSC आंदोलन स्थगित, राज ठाकरे यांचा विवेकानंद पाटील याला फोन, थेट…

Raj Thackeray Calls Vivekananda Patil : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर विद्यार्थी आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील त्याच्या मूळ गावी परतला. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्याशी संपर्क साधला. काय मोठी घडामोड?

Raj Thackeray: पुण्यातील MPSC आंदोलन स्थगित, राज ठाकरे यांचा विवेकानंद पाटील याला फोन, थेट...
राज ठाकरे यांचा विवेकानंद पाटील यांना थेट फोन
| Updated on: Oct 14, 2026 | 12:47 PM
Share

Raj Thackeray Calls Vivekanand Patil : MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर आता या आंदोलनातील विद्यार्थी नेत्यांची अजूनही क्रेझ ओसरली नसल्याचे समोर आले आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने आणि चौकशी समिती स्थापन केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हे आंदोलन आपल्या धारदार आणि खास कोल्हापूर लहेजाने गाजवणाऱ्या विवेकानंद पाटील याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला. मुंबईला भेटण्यासाठी बोलावल्याची माहिती त्याने दिली.

मुंबईला ये, भेटून जा

एमपीएससीच्या आंदोलनात कोल्हापूरमधील विवेकानंद पाटील याच्या सडेतोड भाषणाने तरुणाच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांच्या उत्स्फुर्त आणि मुद्देसुद भाषणाची राज्याच चर्चा झाली. त्याचा हजरजबाबीपणा आणि कोल्हापूर लकबीने त्याने भाषणं गाजवली. भाजपच्या अनेक नेत्यांना त्याने शिंगावर घेतले. त्यांना तोडीसतोड उत्तर देताना त्याने मर्यादा सोडल्या नाहीत. त्याचं ही अनेकांनी कौतुक केलं. त्याच्या भाषणातून कोल्हापूरच्या तालमीतील या रांगड्या गड्यानं अनेकांना घाम फोडला. या आंदोलनाला अनेक नेत्यांनी, फर्राटेदार, फक्कड, लांबपल्ल्याची भाषणं करणाऱ्यांनी भेटी दिल्या. त्या सर्वांनीच विद्यानंदचं कौतुक केलं.

आंदोलनानंतर गावी पोहचलेल्या विवेकानंद पाटील याने आंदोलन काळातील आठवणी जागवल्या. आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम हे कायम सोबत होते. उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे वारंवार फोन करून विचारपूस करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या आंदोलनाला हजेरी लावली. तर त्यांचा नुकताच फोन येऊन गेला. लढ्याला यश मिळालं. आता मुंबईला येऊन भेटून जा, असा निरोप राज ठाकरे यांनी दिल्याचे विवेकानंदने सांगितले. आता आपण मुंबईला जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्याने सांगितले.

गावात जंगी स्वागत

आपल्या भाषणांनी आंदोलनाला चारचांद लावणारा विवेकानंद पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी माजगाव येथे परतला. राधानगरी तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गावकऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. विद्येच्या माहेरघरात कोल्हापूरचा फड गाजवणाऱ्या विवेकानंदाचं गावकऱ्यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या पठ्ठ्याने गावातही जोरदार भाषण ठोकले. उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....