AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजेंची पोस्ट सोशल मीडिया व्हायरल, शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेऊन घेतला मोठा निर्णय

Udayanraje Bhosale Social Media Post: खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

उदयनराजेंची पोस्ट सोशल मीडिया व्हायरल, शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेऊन घेतला मोठा निर्णय
उदयनराजे यांचा शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय
| Updated on: Oct 14, 2026 | 12:00 PM
Share

Udayanraje Bhosale decision: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळ्यातील झगमगाट टाळण्याचा संवेदनशील निर्णय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. या पारंपरिक सोहळ्याला साधेपणाची जोड देण्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता

सातारा जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम हातचा गेला आहे. पाण्याअभावी पीकं करपू लागली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे. अशावेळी शाही दसरा महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये दुष्काळाची दाहकता दिसत आहे. सरकारी यंत्रणेकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात माण, खटाव आणि फलटण तालुक्यांना यंदा दुष्काळाच्या भीषण झळा बसल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील 45 गावं, 254 वाड्यांवर 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

कोयना धरणात 36 दिवसांत 10.42 टीएमसी पाण्याची घट

यंदा जिल्ह्यात पाऊसमान उशीरा सुरू झाले. यंदा 3 सप्टेंबर रोजी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पण त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे धरणातील पाण्यात मोठी घट आली. गेल्या 36 दिवसांत धरणातील 10.42 टीएमसी पाणी घटले. धरणाची पाणी पातळी आताच हिवाळ्यात तब्बल 8 फूट खाली आली. सध्या धरणात 94.83 टक्के टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. अजून जून उजाडायला सात महिने बाकी आहे. यामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

साताऱ्याचा शाही दसरा

साताऱ्यातील ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचे अबालवृद्धांना आकर्षण असते. या दिवशी राजवाड्यात सजवला जातो. विद्युत रोषणाईत तो न्हाऊन निघतो. पारंपारिक वाद्य, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांच्या पूजेने एक वेगळीच शान दिसते. ऐतिहासिक जलमंदिर पॅलेसमध्ये छत्रपती घराण्याच्या वतीने हा सोहळा होतो.

Follow Us
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?