AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Politics: आधी माफी, नंतर छगन भुजबळांचे नाव घेत शिंदेंच्या नेत्याचे मोठे विधान, राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या!

भुजबळ साहेब तशी हुशार आहेत, कुठे उभे रहायचे हे त्यांना चांगलं माहिती आहे. भुजबळ साहेबांना किती त्रास होतो हे देखील मला माहिती आहे मात्र हे बोलण्याचे व्यासपीठ नाही,असे मोठे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Jalgaon Politics: आधी माफी, नंतर छगन भुजबळांचे नाव घेत शिंदेंच्या नेत्याचे मोठे विधान, राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या!
Chhagan Bhujbal
| Updated on: Nov 29, 2026 | 4:44 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनधी: शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असतात. विरोधकांसह, मित्रपक्षांमधील नेत्यांवरही ते बेधडकपणे निशाणा साधत असतात. नेहमी आपल्या भाषणांनी विरोधकांना नामोहरम करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागितली, त्यानंतर त्यांनी भुजबळांचे नाव घेत मोठे विधान केले ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. एरंडोल येथे विकास सोसायटीचे उद्घाटन व नामकरण कार्यक्रम पार पडला त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? वाचा…

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“आज जळगावमध्ये दोन मंत्र्‍यांचे दौरे अन् त्यात बँकेचे मतदान असल्याने कार्यक्रमास येण्यास उशिर झाला. त्यामुळे भुजबळ साहेबांची मी नम्रपणे माफी मागतो. दुष्काळी परिस्थितीमुळे मध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. सरकारने तातडीने 5 हजारांची मदत शेतकऱ्यांना केली. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाले आहे. तितकी देखील मदत पुढच्या काळात सरकार करणार आहे,असं म्हणतात पाणी आणि रक्त बनवणारी मशीन अजून जन्माला यायची आहे. देव बाप्पाच्या मनात यावेळी काय होतं माहित नाही मात्र त्याच्याशिवाय कुठलेही काम पूर्ण होऊ शकत नाही,” असंही गुलाबराव पाटील यावेसळी म्हणाले.

‘भुजबळ साहेबांना किती त्रास होतो मला माहिती…’

“मी पहिल्यांदा जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. जिल्हा बँकेच्या सेक्रेटरींची हालत काय आहे आपण बघतो आहे त्यांचे पगार नाहीत. भुजबळ साहेबांना जर तुम्ही विचारलं की बँकेत निवडणुकीत उभे राहिले होते का? तर ते नाही म्हणाले. भुजबळ साहेब तशी हुशार आहेत, कुठे उभे रहायचे हे त्यांना चांगलं माहिती आहे. भुजबळ साहेबांना किती त्रास होतो हे देखील मला माहिती आहे मात्र हे बोलण्याचे व्यासपीठ नाही. ओबीसीमध्ये मी देखील तुमच्यासोबत काम करतो तिथे तुम्हाला किती त्रास होतो हे मला माहिती आहे,” असे मोठे विधानही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!