AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपहरणाच्या संशयावरून एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग दिल्लीऐवजी थेट..

फ्लायदुबईच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता दिल्लीला निघालेल्या विमानात घडलेल्या घडनेने खळबळ उडाली. जर्मनीहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानाचे आपत्कालीन लँडिंग जयपूरमध्ये करण्यात आले.

अपहरणाच्या संशयावरून एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग दिल्लीऐवजी थेट..
Air India flight
| Updated on: Oct 14, 2026 | 12:43 PM
Share

फ्लायदुबईची घटना ताजी असतानाच एअर इंडियाच्या विमानाबद्दल धक्कादायक बातमी पुढे येतंय. जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग जयपूर येथे करण्यात आले. विमान हायजॅक झाल्याच्या वृत्तानंतर हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ज्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत ती बातमी अफवा असल्याचे निष्पन्न झाले. पण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. यंत्राना अलर्ट मोडवर आल्या. अहमदाबादमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सकाळी 9 वाजून 05 मिनिटाला एअर इंडियाच्या AI 2030 या विमानाबाबत आपत्कालीन सूचना मिळाली. त्यानंतर दिल्लीकडे न जाता विमानाची दिशा बदलून विमानाला जयपूरकडे वळवण्यात आले.

जयपूरला विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानाने काल रात्री 10 वाजून 45 मिनिटाला उड्डाण केले होते. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याने विमानतळावरही घबराटीचे वातावरण होते. विमानतळावरील सुरक्षा व आपत्कालीन कार्यपद्धती कार्यान्वित करण्यासोबतच जयपूर पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशमन दल आणि इतर अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. राजस्थान पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही विमानतळावर पोहोचले होते.

सर्व सुरक्षा योजना अगोदरच तयार ठेवण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, विमान मुंबई फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये असताना वैमानिकाने स्क्वॉक कोड 7500  प्रविष्ट केला. हा कोड वैमानिकांकडे फक्त बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा विमान अपहरणाचे संकेत असतील त्यावेळीच दिला जातो. हा कोड वैमानिकांनी पाठवल्याने खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईंग 787-9 विमानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एआय 2030 या विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि त्यानंतर सुरक्षेच्या तपासणीसाठी ते आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले.

मालवीय नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिव दयाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर विमानाची सर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळतंय. दुबईकडून तेल अवीवकडे निघालेल्या विमानात धक्कादायक घटना घडली. थेट को पायलटने हल्ला करत पायलटला जखमी केले आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!