PM Modi Hyundai Motor Group : पीएम मोदींना भेटल्यानंतर हुंडई कंपनीची भारताच्या कार क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणारी मोठी घोषणा
PM Modi Hyundai Motor Group : ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. जगातील अनेक देशाच्या गाड्या इथे विकल्या जातात. छोट्या कारपासून ते आलिशान गाड्यांची विक्री भारतात होते. ऑटोमाबाइल क्षेत्राचा विकास हे सुद्धा देशातील समृद्धीचं एक लक्षण आहे.

आज भारतात देश-विदेशातील अनेक कंपन्यांच्या गाड्या विकल्या जातात. जगातील अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांसाठी भारत फक्त एक गाड्या विकण्याचं ठिकाण नाहीय, तर भारत एक मोठा ऑटो हब म्हणून विकसित होत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात गाड्यांचं उत्पादन होत असून इथून त्या कार्स जगातील कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जात आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रातील मोठी कंपनी हुंडई मोटर ग्रुपने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पुढच्या 6 वर्षांसाठी भारतात 1.55 बिलियन डॉलर (जवळपास 1,47,277 कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हुंडई मोटर ग्रुपचे एग्जीक्यूटिव चेअरमन ईइसुन चुंग यांची 13 ऑक्टोंबर 2026 रोजी नवी दिल्लीत बैठक झाली. त्यात या महागुंतवणूकीची घोषणा करण्यात आली.
हुंडई कंपनीच्या या निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. भारताचा ग्लोबल ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. हा सर्व पैसा मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवणं, नवीन टेक्नोलॉजी डेवलप करणं, रिसर्च अँड डेवलपमेंट आणि सप्लायर नेटवर्क सुधारण्यासाठी खर्च केला जाईल. हुंडई मोटरसाठी भारत महत्वाची बाजारपेठ आहे. आपली गुंतवणूक व्यवस्थितरित्या पुढे नेण्यासाठी कंपनीची एक वेगळी इन्वेस्टमेंट यूनिट बनवण्याची योजना आहे.
गुंतवणूकीचा वापर कसा होणार?
कंपनीनुसार गुंतवणूकीचा मोठा हिस्सा हुंडई आणि किआ इंडियाच्या वाहन उत्पादनाची क्षमता वाढवण्यावर खर्च केला जाईल. कंपनीचा उद्देश पुढच्या काही वर्षात वाहनांची वाढती मागणी पूर्ण करणं, लोकल लेवलवर पार्ट्सची खरेदी आणि उत्पादन वाढवण्यावर आहे. सोबतच भारताचा ग्लोबल एक्सपोर्ट नेटवर्कही वाढेल. कारण इथे बनवल्या जाणाऱ्या गाड्या इथेच विकल्या जाणार नाहीत, तर दुसऱ्या देशात निर्यात केली जाईल.
व्हीकल टेस्टिंग ट्रॅक सुद्धा बनवण्यात येईल
हुंडई मोटर ग्रुपची भारतात रिसर्च अँड डेवलपमेंट म्हणजे R&D वाढवण्यासाठी जवळपास 700 मिलियन डॉलर म्हणजे 6,200 कोटी रुपयांच्या गुंवतणूकीची योजना आहे. यात व्हीकल टेस्टिंग ट्रॅक सुद्धा बनवण्यात येईल. यामुळे भारतात रस्त्यांची जी अवस्था आहे, त्या हिशोबाने गाड्यांची टेस्टिंग आणि नवीन टेक्नोलॉजी डेवलप करायला मदत मिळेल.
इलेक्ट्रिक वाहन आणि फ्यूचर मोबिलिटी
या गुंतवणूकीमुळे भारतात रिसर्चच चांगलं वातावरण तयार होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. लोकल इंजिनियर्स आणि टेक्नोलॉजी एक्सपर्ट्सना पुढे जाण्याची संधी मिळेल. नेक्स्ट जेनरेशन ऑटोमोबाइल टेक्नोलॉजीवर वेगाने काम करता येईल. इलेक्ट्रिक वाहन आणि फ्यूचर मोबिलिटीशी संबंधित टेक्नोलॉजीच्या विकासात सुद्धा ही गुंतवणूक महत्वाची ठरेल.
