नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत सेनेत एकमत, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर

शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त अन् शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नामकरणावरून निर्माण झालेला संभ्रम दूर झालाय.

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत सेनेत एकमत, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 9:30 PM

– हर्षल भदाणे-पाटील, टीव्ही 9 मराठी, पनवेल

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यावरून निर्माण झालेल्या वादात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त अन् शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नामकरणावरून निर्माण झालेला संभ्रम दूर झालाय. (Consensus in Sena regarding naming of Navi Mumbai Airport after Balasaheb thackeray, confusion among office bearers and activists removed)

स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभा राहणार

दि. बां. पाटलांबद्दल आदर आहेच, मात्र दि. बां. च्या नावावरून राजकारण करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या राजकारणाला बळी न पडता स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावामागे ठाम पणे उभा राहणार असल्याचे मत पनवेल, नवी मुंबई आणि उरण परिसरातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव सिडकोमार्फत करण्यात आल्याने विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षांपासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत.

स्थानिक प्रकल्पग्रस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते कात्रीत सापडलेत

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या ठरावाविरोधात आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये शिवसेनेविरोधात रोष निर्माण झाल्याने याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेविरोधातील राजकीय पक्षांनी सुरू केलाय. तसेच शिवसेनेविरोधात वातावरण निर्माण केल्याने शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते कात्रीत सापडलेत. शनिवारी (ता. 29) खारघर वसाहतीत घेण्यात आलेल्या बैठकीत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नामकरणाविषयी सेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नामकरणावरून संभ्रमात असलेले सेना कार्यकर्त्यांमध्ये एकमत झालंय. तसेच दि. बां. च्या मृत्यूनंतर पनवेल, उरण परिसरात दि. बां. चे उचित स्मारक देखील न उभारू शकलेले स्थानिक नेते बाळासाहेबांच्या नावावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना पदाधिकारी प्रदीप ठाकूर यांनी व्यक्त केले.

दि. बां. चे उचित स्मारक का नाही?

दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, याकरिता आग्रही असलेल्या नेत्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. एखाद्या शैक्षणिक संस्थेला दि. बां. चे नाव देण्याची सद्बुद्धी या नेत्यांना का सुचली नाही, अशी टीका सेनेचे विभागप्रमुख विश्वास पेठकर यांनी केली. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात दिबांचे उचित स्मारक उभे करण्यात अपयशी ठरलेले नेते नामकरणावरून केवळ राजकारण करत असल्याचे मत सेना कार्यकर्ते पद्माकर पाटील यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत सेनेची भूमिका स्पष्ट असून, दि. बां. यांच्यापोटी असलेला आदर व्यक्त करूनच सेनेने आपली भूमिका स्पष्ट केलीय.

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

आता डिस्चार्जआधीच रुग्णालयाच्या बिलांचे लेखा परीक्षण, नवी मुंबई महापालिकेत कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष

Consensus in Sena regarding naming of Navi Mumbai Airport after Balasaheb, confusion among office bearers and activists removed

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.