सर्वात मोठी राजकीय बातमी… शरद पवार यांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

जेव्हा महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा चालू होती. तेव्हा आम्ही एक मुद्दा मांडला होता की, आपण धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित केले. पाच वर्षे भाजपसोबत जाणार नसल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सर्वात मोठी राजकीय बातमी... शरद पवार यांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 7:01 PM

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपचे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का? असा सवाल करतानाच राजनाथ सिंह यांच्याशी काय चर्चा झाली? ही चर्चा शरद पवार यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांच्या या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता. राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तब्येत बिघडल्यावर कोणी फोन करत नाही

ऐन निवडणुकीत कोणाची तब्येत बिघडली तरी कॉल करत नाही. पण शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना कॉल का केला? याचा खुलासा करावा. ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला? याचा खुलासा केला पाहिजे. उत्तरं देताना कोणतीही बालबोध उत्तर देऊ नका, खरं कारण काय हे त्यानी सांगावं. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या. कॉल केला की नाही त्यांनी सांगावं. पुढे आम्ही काय ते बोलू, असं आंबेडकर म्हणाले. निवडणुकीत असे फोन केले जात नाही. त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यामुळे शरद पवार यांनी खुलासा करावा. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मदत करण्यासाठी फोन केला का?, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंसाठी काम केलं

आम्ही बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.