
कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 04 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
– पुण्यात दिवसभरात 316 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 297 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधित 13 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू,
– 297 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 479732.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2783.
– एकूण मृत्यू – 8612.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 468337.
– आज केलेल्या एकूण तपासण्या – 5734.
नागपूर मनपा केंद्रांमध्ये सोमवारी कोव्हिशिल्डचे लसीकरण होणार नाही. शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हिशिल्ड लसींचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्रांवर सोमवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
आज नागपुरात कोरोना मुळे 2 रुग्णांचा मृत्यू
19 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
31 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 477195
बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांची संख्या – 468000
एकूण मृत्यू – 9031
शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे सोमवारी (05 जुलै) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हिड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत असतानाच नागपुरात 12 दिवसाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या बाळाचा मृत्यू झाला. दगवलेल्या मुलाचे कुटुंब मध्यप्रदेश मधील शिवनी येथील आहे.
नवी दिल्ली :
देशात 24 तासात नवे रूग्ण – 43,071
देशात 24 तासात मृत्यू – 955
देशात 24 तासात डीस्चार्ज – 52,299
एकूण रूग्ण – 3,05,45,433
एकूण मृत्यू – 4,02,005
एकूण डीस्चार्ज – 2,96,58,078
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 4,85,350
एकूण लसीकरण – 35,12,21,306
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
पिंपरी चिंचवड
-शहरातील 81 टक्के नागरिकांना होऊन गेला कोरोना,सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
-10 हजार नागरिकांपैकी 8207 नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज,याचे प्रमाण 81.40 टक्के आहे
-गावठाण भागातील सर्वाधिक म्हणजेच 84.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे तर 1 हजार 875 नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18.6 टक्के आहे
-महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाने केला सिरो सर्वेक्षन
नागपूर –
आज नागपुरात कोणत्याही शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये लसीकरण होणार नाही
शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोविशीइल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे राहणार लसीकरण बंद
मनपा क्षेत्रातील कोणत्याही शासकीय व मनपाच्या लसीकरण केन्द्रांवर नागरिकांचे लसीकरण होणार नाही,
ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.
काल नागपुरात लस उपलब्ध झाली होती त्यात 30 हजार 694 जणांचे करण्यात आले लसीकरण।
राज्यात काल 9,489 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
तर 8,395 कोरोना बाधित रुग्ण बरे
एकूण 58,45,315 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी
राज्यात एकूण 1,17,575 ऍक्टिव्ह रुग्ण
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.00% झाले आहे.
राज्यात आज 9,489 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,395 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,45,315 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,17,575 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.00% झाले आहे. pic.twitter.com/V6oRHPFM6J
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 3, 2021
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 1124 कोरोना रुग्ण आढळले
म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 295, आज आढळलेले रुग्ण 2, आज मृत्यू – 1
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 12 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4120 वर
अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9880
आज 935 जण आज कोरोना मुक्त
आजअखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1,34,911 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद 1,48, 911 वर