परदेशात कोरोना पुन्हा सक्रिय होतोय; शरद पवारांचा सावधानतेचा इशारा

देशात कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना कमी होतोय असं म्हणाले आहेत. पण आपण बेफिकीर राहून चालणार नाही असे म्हणत, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Corona is reactivating in abroad said Sharad Pawar appeal ro take precautions)

परदेशात कोरोना पुन्हा सक्रिय होतोय; शरद पवारांचा सावधानतेचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 6:36 PM

पुणे : देशात कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना कमी होतोय असं म्हणाले आहेत. पण आपण बेफीकीर राहून चालणार नाही. अमेरिकासारख्या देशात कोरोना पुन्हा सक्रिय होताना दिसतोय, असे म्हणत, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ते पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण समारंभात बोलत होते. (Corona is reactivating in abroad said Sharad Pawar appeal ro take precautions)

पंचशील फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 रुग्णवाहिका देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या रुग्णवाहिका पुणे शहराला दिल्या. या कार्यक्रमात पंचशील फाऊंडेशनचे अतुल चोरडिया, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, “पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा खूप लोक मृत्युमुखी पडले होते. 1895 मध्ये काँग्रेसचे पुण्यातील अधिवेशन मुंबईत हलवावे लागले होते. त्यानंतर पहिल्यांदाच देशात एवढी मोठी साथ आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय. मृत्यूचं प्रमाणही कमी होताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कोरोना कमी होत असल्याचं म्हणाले आहेत. पण आमेरिकासारख्या देशात कोरोना आटोक्यात आल्यानंतर त्याचा संसर्ग पुन्हा वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपण  बेफिकीर राहून चालणार नाही. प्रत्येकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे.”

शरद पवारांकडून राज्य सरकारची पाठराखण

यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी कोरोना काळातील राज्य सरकारच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “राज्याचे आरोग्य़मंत्री राजेश टोपे सर्व जिल्ह्यात जाऊन आले. त्यांनी कोरोना परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला. तसेच अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेदेखील याच कामात होते. राज्य सरकाने जनतेला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी जे जे करायला हवं ते केलं.” तसेच त्यांनी स्वत: सांगली, सातारा, पुणे, बीड, ठाणे, परभणी सारख्या जिल्ह्यात जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता सातारा, पुणे जिल्ह्यात रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आज दिलेल्या सहा रुग्णवाहिका या इतर रुग्णवाहिकांपेक्षा वेगळ्या असल्याचं ते म्हणाले. तसेंच लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकांचा वापर चांगला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या : कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय – भागवत

Health | आरोग्यासह केसांवरही कोरोनाचा गंभीर परिणाम, संशोधनादरम्यान तज्ज्ञांचा खुलासा!

मोठी बातमी…भारतात कोरोनामुक्त होण्याचा दर 90 टक्क्यांवर, आरोग्य मंत्रालयाची माहिती

(Corona is reactivating in abroad said Sharad Pawar appeal ro take precautions)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.