Health | आरोग्यासह केसांवरही कोरोनाचा गंभीर परिणाम, संशोधनादरम्यान तज्ज्ञांचा खुलासा!

या संशोधनानंतर, कोरोना रूग्णाचे केस इतके कसे गळतात, याबद्द्ल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती.

Health | आरोग्यासह केसांवरही कोरोनाचा गंभीर परिणाम, संशोधनादरम्यान तज्ज्ञांचा खुलासा!

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी (Corona Virus) संघर्ष करत आहोत. त्याच वेळी जगभरातले डॉक्टर आणि वैज्ञानिक या प्राणघातक महामारीची लस शोधण्यात गुंतले आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे देखील काळानुसार वाढत चालली आहेत. सुरुवातीला सौम्य ताप, कफ आणि घश्याचा त्रास ही कोरोनाची सामान्य लक्षणे होती. मात्र, याव्यतिरिक्त आता कोरोना रूग्णांमध्ये केस गळणे (Hair Loss) ही आणखी एक समस्या दिसून येत आहे. एका नवीन संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे. (Corona Virus Patients facing hair loss issue)

कोरोना आणि केस गळतीची समस्या

कोरोना आणि केस गळती यांच्यात काय संबंध आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे केस प्रचंड प्रमाणात गळले आहेत.

इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अ‍ॅन्ड सर्व्हायवर कॉर्प फेसबुकचे प्रोफेसर नताली लॅमबर्ट यांच्या टीमने यासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 1500 लोकांचा समावेश होता. सर्व्हेमध्ये सामील असलेल्या सर्व लोकांना बऱ्याच काळासाठी कोरोनाची लागण झाली होती. या आजारातून बरे झाल्यानंतरही त्याचा परिणाम बर्‍याच दिवसांपर्यंत दिसून आला. या अभ्यासाच्या अहवालानुसार, सर्वेक्षणात सामील झालेल्या 25 लोकांमध्ये केस गळतीची समस्या आढळली. या दरम्यान, सर्दी आणि नाक बंद होण्याच्या समस्येपेक्षा केस गळतीची समस्या अधिक भासल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.(Corona Virus Patients facing hair loss issue)

केस गळतीचे मुख्य कारण

या संशोधनानंतर, कोरोना रूग्णाचे केस इतके कसे गळतात, याबद्द्ल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु यामागचे वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु काही अभ्यासकांनी, कोरोना काळातील ताण आणि तणाव हेच केस गळतीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. या स्थितीस ‘टेलोजेन इफ्लुव्हियम’ असे देखील म्हणतात. टेलोजेन इफ्लुव्हियममध्ये कोणत्याही रोग किंवा ताण- तणावामुळे काही काळ केस गळतीची समस्या निर्माण होते. याशिवाय संसर्गाच्या वेळी पौष्टिक आहाराअभावीही आपले केसही गळू शकतात.

बचाव कसा कराल?

तज्ञाच्या सूचनेनुसार, कोरोनामुळे केस गळणे हे केवळ तात्पुरत्या स्वरुपात असू शकते. यावेळी, रुग्णाने आपला ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या व्यतिरिक्त आपला आहार सर्वात महत्त्वाचा आहे. यादरम्यान, व्हिटॅमिन-डी आणि आयर्न युक्त, पौष्टिक घटक असलेले आरोग्यदायी अन्न आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. यातून मिळणारी रोग प्रतिकारशक्तीच आपल्याला या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

(Corona Virus Patients facing hair loss issue)

हेही वाचा : 

Covaxin | भारतात पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु, संपूर्ण जगाचं लक्ष

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *