Covaxin | भारतात पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु, संपूर्ण जगाचं लक्ष

भारतात कोरोना विषाणूच्या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. भारत बायोटेक या कंपनीने ही घोषणा केली.

Covaxin | भारतात पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु, संपूर्ण जगाचं लक्ष
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 8:07 PM

मुंबई : भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे (Human Testing Of Corona Virus Vaccine). भारतात कोरोना विषाणूच्या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. भारत बायोटेक या कंपनीने ही घोषणा केली. झॅडस कॅडिला या कंपनीलाही लस चाचणीसाठी केंद्राची परवानगी मिळाली आहे. देशात सध्या दोन कंपन्याकडून कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत (Human Testing Of Corona Virus Vaccine).

भारत बायोटेक कंपनीने पहिल्यांदा कोरानाची लस तयार केली. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली. त्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली, तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली आहे. या लसीकडे देशासह जगभरातील लोकांच्या आशा आहेत.

Human Testing Of Corona Virus Vaccine

संबंधित बातम्या :

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल, हसन मुश्रीफ यांचा दावा

Corona Virus | हवेतून कोरोनाचा संसर्ग शक्य, WHO नव्या गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता

भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.